एपी, जेद्दा (सौदी अरेबिया)

इंग्लंडमधील बलाढय फुटबॉल संघ मँचेस्टर सिटीने आपले वर्चस्व अधोरेखित करताना क्लब विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकावले. सिटीने अंतिम सामन्यात ब्राझिलियन संघ फ्लुमिनेसेवर ४-० असा विजय मिळवताना २०२३ वर्षांतील आपले पाचवे जेतेपद पटकावले.

India T20 World Cup Squad Announced 2024 Marathi News
ICC T20 World Cup: संजू सॅमसन, शिवम दुबेला वर्ल्डकपचं तिकीट; हार्दिक पंड्या उपकर्णधार, टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघ जाहीर
Marcus Stoinis Highest individual scores in IPL run chases with 124 Runs
IPL 2024: मार्कस स्टॉइनसची ऐतिहासिक खेळी, आयपीएलच्या इतिहासात ही कामगिरी करणारा पहिला फलंदाज
Hardik Pandya Slapped With Fine Of 12 Lakh rupees By BCCI
मुंबई इंडियन्सचा विजय सेलिब्रेट करताना हार्दिक पंड्याला धक्का; ‘या’ साठी बीसीसीआयने ठोठावला १२ लाखांचा दंड
Champions League Football Barcelona beat Paris Saint Germain sport news
चॅम्पियन्स लीग फुटबॉल: बार्सिलोनाची पॅरिस सेंट-जर्मेनवर मात

हेही वाचा >>> डेव्हिस चषक टेनिस लढतीसाठी भारताला पाकिस्तानात जावेच लागणार!

अंतिम लढतीत मँचेस्टर सिटीने ४० सेकंदाच्या आतच आघाडी मिळवली. आघाडीपटू ज्युलियन अल्वारेझने हा गोल झळकावला. फ्लुमिनेसेचा कर्णधार निनोकडून २७व्या मिनिटाला स्वयं गोल झाल्याने मँचेस्टर सिटीला २-० अशी आघाडी मिळाली. उत्तरार्धापर्यंत ही आघाडी सिटीने राखली. उत्तरार्धातही फ्युमिनेसेला सिटीचे आक्रमण रोखता आले नाही. फिल फोडेनने ७२व्या मिनिटाला सिटीसाठी तिसरा गोल नोंदवला. तर अल्वारेझने ८८व्या मिनिटाला केलेल्या वैयक्तिक दुसऱ्या गोलमुळे सिटीला ४-० अशी आघाडी मिळाली. अखेर याच गोलफरकाने सिटीने सामन्यात सरशी साधताना आपला पहिला क्लब विश्वचषक किताब जिंकला.

हेही वाचा >>> नवी मुंबईत सोमवार पासून रंगणार आंतरराष्ट्रीय महिला टेनिस चॅम्पियनशिप, १७ देशांतील ६१ खेळाडू सहभागी होणार

मँचेस्टर सिटीने गेल्या हंगामात चॅम्पियन्स लीगचे प्रथमच जेतेपद मिळवले होते. यासह त्यांनी प्रीमियर लीग आणि एफए चषक या स्पर्धाही जिंकल्या होत्या. तसेच नव्या हंगामाच्या सुरुवातीला सिटीने सुपर चषकाचेही जेतेपद मिळवले.

पेप गॉर्डियोला हे तीन वेगवेगळया संघांसोबत क्लब विश्वचषक जिंकणारे पहिले प्रशिक्षक बनले आहेत. यापूर्वी त्यांनी बार्सिलोनाला २००९ आणि २०११ मध्ये या स्पर्धेचे जेतेपद मिळवून दिले. तर २०१३ मध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली बायर्न म्युनिकने ही स्पर्धा जिंकली होती.