scorecardresearch

चॅम्पियन्स लीग फुटबॉल : मँचेस्टर सिटीचा निसटता विजय

डीब्रूएनेच्या पासवरच आघाडीपटू गॅब्रिएल जेसूसने (११ वे मि.) गोल करत संघाची आघाडी दुप्पट केली.

मँचेस्टर : तारांकित मध्यरक्षक केव्हिन डीब्रूएनेच्या (एक गोल आणि एक गोलसाहाय्य) अप्रतिम कामगिरीच्या जोरावर मँचेस्टर सिटीने चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या उपांत्य फेरीतील पहिल्या टप्प्याच्या लढतीत रेयाल माद्रिदवर ४-३ असा निसटता विजय मिळवला.  डीब्रूएनेने दुसऱ्या मिनिटालाच गोल करत सिटीला १-० अशी आघाडी मिळवून दिली. डीब्रूएनेच्या पासवरच आघाडीपटू गॅब्रिएल जेसूसने (११ वे मि.) गोल करत संघाची आघाडी दुप्पट केली. माद्रिदचा आघाडीपटू करीम बेन्झेमाने ३३व्या मिनिटाला गोल केला. उत्तरार्धात फील फोडेन (५३वे मि.) आणि बर्नाडो सिल्वा (७४वे मि.) यांनी सिटीचे अन्य दोन गोल केले. तर, माद्रिदकडून व्हिनिसियुस (५५वे मि.) आणि बेन्झेमा (८२वे मि.) यांनी गोल केले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Manchester city s thrilling champions league victory over real madrid zws

ताज्या बातम्या