ऑस्ट्रेलियाचा महान गोलंदाज ग्लेन मॅकग्राचा शुक्रवारी हॉल ऑफ फेम यादीत समावेश करण्यात आला. महान क्रिकेटपटूंच्या या मांदियाळीत झळकणारा तो ६८वा क्रिकेटपटू ठरला आहे. ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या कसोटीदरम्यान त्याला ‘हॉल ऑफ फेम कॅप’ प्रदान करण्यात आली. यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) अध्यक्ष अ‍ॅलन इसाक तसेच क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष वॉली एडवर्ड्स उपस्थित होते. १२४ कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मॅकग्राने २१.६४च्या सरासरीने ५६३ विकेट्स मिळवल्या आहेत. १९९९, २००३ आणि २००७मध्ये ऑस्ट्रेलियाला विश्वचषक जिंकून देण्यात मॅकग्राने मोलाची भूमिका बजावली होती.