मिल्खा सिंग यांना करोनाची लागण

‘फ्लाइंग सिख’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ९१ वर्षीय मिल्खा यांच्यात करोनाची सौम्य लक्षणे आढळून आली आहेत.

भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांना करोनाची लागण झाली असून त्यांना चंडीगड येथील निवासस्थानी विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. ‘फ्लाइंग सिख’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ९१ वर्षीय मिल्खा यांच्यात करोनाची सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. ‘‘आमच्या काही मदतनीसांना करोनाची लागण झाल्याने कुटुंबातील सर्व सदस्यांनी चाचणी करवून घेतली. त्यापैकी माझा अहवाल सकारात्मक आल्याने मी चकित झालो आहे. कुटुंबातील सर्वाचा अहवाल नकारात्मक आला आहे. येत्या तीन-चार दिवसांत मी पूर्णपणे बरा होईन, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. गुरुवारपासून मी सरावाला सुरुवात केली आहे,’’ असे मिल्खा यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Milkha singh corona virus sports ssh

Next Story
विजयी भव !
ताज्या बातम्या