शारजा : डेव्हिड मिलर (१३ चेंडूंत नाबाद २३) आणि कागिसो रबाडा (७ चेंडूंत नाबाद १३) यांनी अखेरच्या षटकांत केलेल्या फटकेबाजीमुळे दक्षिण आफ्रिकेने शनिवारी ट्वेन्टी-२० विश्वचषकात श्रीलंकेवर चार गडी आणि एक चेंडू राखून मात केली.

शारजा येथे झालेल्या या सामन्यात श्रीलंकेने दिलेले १४३ धावांचे आव्हान आफ्रिकेने १९.५ षटकांत पूर्ण केले. आघाडीच्या फळीतील फलंदाज बाद झाल्यावर कर्णधार तेम्बा बव्हुमा (४६) आणि एडिन मार्करम (१९) यांनी चौथ्या गड्यासाठी ४७ धावांची भागीदारी रचली. मात्र, फिरकीपटू वनिंदू हसरंगाने दोघांना बाद केले. परंतु, दोन षटकांत २५ धावांची गरज असताना मिलरने दोन, तर रबाडाने एक षटकार मारत आफ्रिकेला विजय मिळवून दिला.

संक्षिप्त धावफलक

श्रीलंका : २० षटकांत सर्वबाद १४२ (पथुम निसंका ७२; तबरेझ शम्सी ३/१७, ड्वेन प्रिटोरियस ३/१७) पराभूत वि. दक्षिण आफ्रिका : १९.५ षटकांत ६ बाद १४६ (तेम्बा बव्हुमा ४६, डेव्हिड मिलर नाबाद २३; वानिंदू हसरंगा ३/२०)