Mohammad Rizwan Sledging Video Viral: क्रिकेटमध्ये स्लेजिंगने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अनेकदा खेळाडू प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंचे लक्ष विचलित करण्यासाठी स्लेजिंग करतात. आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान हा देशबांधव इफ्तिखार अहमद स्लेजिंग करताना दिसत आहे. रिझवानच्या स्लेजिंगनंतर इफ्तिखारनेही आपली विकेट गमावली.

ही घटना सध्या खेळल्या जात असलेल्या ग्लोबल टी-२० कॅनडा लीगमध्ये घडली आहे. मोहम्मद रिझवान लीगमध्ये व्हँकुव्हर नाइट्सकडून खेळत आहे. त्याचवेळी इफ्तिखार अहमद सरे जग्वार्सची कमान सांभाळत आहेत. क्वालिफायरचा पहिला सामना व्हँकुव्हर नाईट्स आणि सरे जग्वार्स यांच्यात झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सरे जग्वार्सचा कर्णधार इफ्तिखार अहमद चांगलाच लयीत दिसत होता. मात्र मोहम्मद रिझवानने त्याला स्लेजिंग करून बाद केले.

Tristan Stubbs fielding video viral in DC vs GT Match
DC vs GT : ट्रिस्टन स्टब्सच्या सीमारेषेवरील शानदार फिल्डिंगने सामन्याला दिली कलाटणी, VIDEO व्हायरल
ipl 2024 gujarat titans beautiful mystery girl compared with hollywood actress ana de armas shubman gill reaction viral
VIDEO : पृथ्वी शॉच्या गर्लफ्रेंडवर शुबमन गिलचा डोळा? नेटिझन्स म्हणाले, “ओहह भावा…”
IPL 2024 PBKS Vs RR Match Updates in Marathi
PBKS vs RR : संजू सॅमसनने धोनीप्रमाणे दाखवली चतुराई, लियाम लिव्हिंगस्टोनच्या ‘रनआऊट’चा VIDEO होतोय व्हायरल
Mohammad Nabi's Son Video Viral
IPL 2024 : मोहम्मद नबीच्या गोलंदाजीवर मुलाने मारला ‘हेलिकॉप्टर शॉट’, VIDEO होतोय व्हायरल

इफ्तिखार अहमदने १७व्या षटकातील पहिल्या दोन चेंडूंवर सलग दोन षटकार ठोकले. यानंतर तिसऱ्या चेंडूपूर्वी कीपिंग करणारा मोहम्मद रिझवान इफ्तिखार अहमदला काहीतरी म्हणाला. सोशल मीडियावर केल्या जात असलेल्या दाव्यानुसार, दोन्ही पाकिस्तानी खेळाडू पश्तो भाषेत बोलत होते. या संवादानंतर इफ्तिखार अहमदने तिसऱ्या चेंडूवर षटकार खेचण्यासाठी बॅट फिरवली, पण यावेळी त्यासला नशिबाने साथ दिली नाही आणि तो बाद झाला.

यावेळी चेंडू इफ्तिखारच्या बॅटवर नीट लागला नाही आणि हवेत गेला. त्यामुळे त्याला झेल देऊन विकेट गमवावी लागली. स्लेजिंगवरून इफ्तिखारचे लक्ष विचलित करण्यात रिझवान पूर्णपणे यशस्वी ठरला. इफ्तिखार अहमदने २८ चेंडूंत ३६ धावांची खेळी खेळली, ज्यात त्याने २ चौकार आणि २ षटकार मारले.

हेही वाचा – Saurabh Walker: टीम इंडियासाठी धोक्याची घंटा! न्यूझीलंडने विश्वचषकसाठी मुंबईच्या ‘या’ रणजी चॅम्पियनची केली निवड

मोहम्मद रिझवानच्या संघाने गमावला होता –

व्हँकुव्हर नाईट्स आणि सरे जॅग्वार्स यांच्यात झालेल्या सामन्यात जॅग्वार्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ गडी गमावून १३९ धावा केल्या. कर्णधार इफ्तिखार अहमदने संघाकडून सर्वात मोठी ३६ धावांची खेळी खेळली. धावांचा पाठलाग करताना व्हँकुव्हर नाईट्सचा संघ १६.४ षटकांत १०१ धावांत सर्वबाद झाला.