हैदराबादविरुद्ध सामन्यात पहिला दिवस मुंबईने गाजवला, मात्र दुसऱ्या दिवशी यजमानांनी आपले वर्चस्व सिद्ध केले. पहिल्या दिवसअखेर २ बाद ३२५ अशा सुस्थितीत असणाऱ्या मुंबईची गाडी दुसऱ्या दिवशी एकदमच घसरली आणि त्यांचा डाव ४४३ धावांतच संपुष्टात आला. दीडशतकी खेळी करणाऱ्या हिकेन शाहला आपल्या वैयक्तिक धावसंख्येत केवळ २ धावांची भर घालता आली. रवी किरणने १५६ धावांवर त्याला बाद केले. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माकडून मोठय़ा अपेक्षा होत्या. १०२ वरून पुढे खेळणारा रोहित केवळ १० धावा करून मोहम्मद खादेरच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर अभिषेक नायरने एकाकी झुंज दिली, मात्र त्याला खंबीर साथ मिळू शकली नाही. नायरने ७ चौकारांसह ६४ धावांची खेळी केली. क्षेमल वायंगणकरने ७ चौकारांसह ३३ धावा फटकावत मुंबईला चारशेचा टप्पा ओलांडून दिला. दोन शतकवीर पाचशेचा टप्पा सहज ओलांडून देतील आणि मुंबईला सामन्यावर पकड मिळवता येईल, अशी अपेक्षा होती. मात्र हैदराबादतर्फे आशीष रेड्डीने भेदक गोलंदाजी करत मुंबईचे मनसुबे उधळून लावले. प्रत्युत्तरादाखल खेळताना हैदराबादने सावध सुरुवात केली आहे.
सलामीवीर अभिनव कुमार १३ धावांवर बाद झाला. क्षेमल वायंगणकरने त्याला बाद केले. यानंतर अक्षत रेड्डी आणि हनुमा विहारी यांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत डाव सावरला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा हैदराबादच्या १ बाद १३८ धावा झाल्या आहेत. अक्षत रेड्डी ६३, तर हनुमा विहारी ५३ धावांवर खेळत आहे. हैदराबादचा संघ अजूनही ३०५ धावांनी पिछाडीवर आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 26th Nov 2012 रोजी प्रकाशित
हैदराबादविरुद्ध मुंबईची घसरण
हैदराबादविरुद्ध सामन्यात पहिला दिवस मुंबईने गाजवला, मात्र दुसऱ्या दिवशी यजमानांनी आपले वर्चस्व सिद्ध केले. पहिल्या दिवसअखेर २ बाद ३२५ अशा सुस्थितीत असणाऱ्या मुंबईची गाडी दुसऱ्या दिवशी एकदमच घसरली आणि त्यांचा डाव ४४३ धावांतच संपुष्टात आला.

First published on: 26-11-2012 at 04:20 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai dull start against hyderabad