मुंबईचा पहिल्या डावात १५४ धावांत खुर्दा उडवल्आव्हान टिकवण्यासाठीच्या अतिमहत्त्वपूर्ण लढतीमध्ये गजविजेता मुंबईचा रणजी संघ पराभवाच्या छायेत आहे. गुजरातविरुद्धच्या सामन्यात मुंबईने पहिल्या डावातील आघाडी गमावली असून आता सामना जिंकणेही त्यांच्यासाठी कठीण बनले आहेत. यावर गुजरातने पहिल्या डावात २५३ धावा करत पहिल्या डावाची आघाडी मिळवली आहे. मुंबईसाठी आता हा सामना जिंकणे अनिवार्य असले तरी त्यांची दुसऱ्या डावात ४ बाद ७६ अशी अवस्था असून ते अजूनही २३ धावांनी पिछाडीवर आहेत.
सोमवारच्या २ बाद ९० धावांवरून पुढे खेळताना गुजरातने समित गोहेलचे अर्धशतक आणि अन्य फलंदाजांच्या उपयुक्त खेळींच्या जोरावर अडीचशे धावांची मजल मारली. गोहेलने ५ चौकारांच्या जोरावर ५८ धावांची खेळी साकारली. मुंबईचा डावखुरा फिरकीपटू इक्बाल अब्दुल्ला याने सहा विकेट्स मिळवत गुजरातच्या धावसंख्येला वेसण घातली.
आघाडी पुसून टाकत दुसऱ्या डावात मोठी धावसंख्या उभारण्याच्या मनसुब्याने मुंबईचा संघ मैदानात उतरला खरा, पण फलंदजांनी पुन्हा एकदा ‘ये रे माझ्या मागल्या’चा प्रत्यय आणून दिला. मुंबईचे दोन्ही सलामीवीर अवघ्या १८ धावांमध्ये तंबूत परतले होते. कर्णधार वसिम जाफर (१६) आणि उपकर्णधार आदित्य तरे (१४) हे दोघे पुन्हा एकदा मोठी धावसंख्या रचण्यात अपयशी ठरले. त्यानंतर सूर्यकुमार यादवने (३४) थोडाफार प्रतिकार केला, पण त्यालाही मोठी खेळी साकारता आली नाही.
संक्षिप्त धावफलक
मुंबई (पहिला डाव) : १५४
गुजरात (पहिला डाव) : १०४.२ षटकांत सर्व बाद २५३ (समित गोहेल ५८; इक्बाल अब्दुल्ला ६/४२).
मुंबई (दुसरा डाव) : ३३ षटकांत ४ बाद ७६ (सूर्यकुमार यादव ३४; जसप्रीत बुमरा ३/१२).

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai team in trouble against gujrat
First published on: 01-01-2014 at 02:08 IST