भारतीय गोलंदाजांवर पूर्णपणे वर्चस्व गाजविणारा पाकिस्तानचा अव्वल फलंदाज नासिर जमशेद आपला सामनावीराचा चषक भारतातच विसरून मायदेशी परतला आहे. पहिल्या दोन सामन्यांत नासिरने लागोपाठ दोन शतके झळकावत पाकिस्तानला मालिका विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. ‘‘विमानतळ गाठण्याच्या नादात मी सामनावीराचा चषक भारतातच विसरून आलो आहे. पण तो माझ्यापर्यंत लवकरच पोहोचेल, असे संघ व्यवस्थापनाने मला कळवले आहे. मायदेशातील चाहत्यांनी आमचे जल्लोषात स्वागत केले, हा क्षण मी माझ्या आयुष्यात कधीही विसरणार नाही,’’ असे नासिरने सांगितले.