नेदरलँड्स संघाचा स्टार फलंदाज बेन कूपर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. वयाच्या २९व्या वर्षी कूपरने क्रिकेटला रामराम ठोकला. २०१३मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या कूपरने नेदरलँड्सकडून ७१ सामने खेळले आहेत. त्याने ट्वीट करून निवृत्ती जाहीर केली. ”आज मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत आहे. ८ वर्षे देशाचे प्रतिनिधित्व करणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. हा काळ विशेष क्षण, आश्चर्यकारक चढ-उतारांनी भरलेला आहे”, असे कूपरने म्हटले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कूपरने नेदरलँड्स क्रिकेटचे आभार मानले आणि म्हटले, ”माझे बालपणीचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. मी माझ्या संघातील विद्यमान आणि माजी खेळाडू आणि प्रशिक्षकांचेही आभार मानतो. छान आठवणींसाठी तुम्हा सर्वांचे आभार.”

हेही वाचा – U19 World Cup 2022 : सेमीफायनलमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया भिडणार; ‘या’ तारखेला होणार महालढत!

बेन कूपर हा नेदरलँड्सचा टी-२० फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याच्या आठ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने ५८ टी-२० सामन्यांमध्ये १२३९धावा केल्या आहेत. कूपरने नेदरलँड्सकडून २०१३ मध्ये कॅनडाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने वनडे आणि प्रथम श्रेणीमध्ये जवळपास हजार धावा केल्या आहेत.

More Stories onआयसीसीICC
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Netherlands batter ben cooper announces international retirement adn
First published on: 30-01-2022 at 16:06 IST