नेयमारने केलेल्या शानदार कामगिरीमुळेच ब्राझील संघाने फ्रान्सविरुद्धच्या प्रदर्शनीय फुटबॉल सामन्यात ३-१ असा विजय मिळविला.
या लढतीत फ्रान्सच्या रॅफेल व्हेरानने सुरेख हेडिंग करीत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र पूर्वार्ध संपण्यापूर्वी ऑस्करने ब्राझील संघाचे खाते उघडत १-१ अशी बरोबरी साधली. उत्तरार्धात सामन्याच्या ५७ व्या मिनिटाला नेयमारने विलीयनच्या पासवर गोलपोस्टमधील उजव्या कोपऱ्यात चेंडू तटवला आणि संघाला २-१ अशी महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. त्यानंतर त्याने केलेल्या जोरदार चालीचा फायदा घेत लुईस गुस्ताव्होने अप्रतिम गोल नोंदवला. हीच ३-१ अशी आघाडी कायम ठेवीत ब्राझीलने विजय
मिळविला.
प्रशिक्षक डुंगा यांच्या मार्गदर्शनाखाली ब्राझील संघाने सलग सातवा विजय मिळविला आहे. या सामन्यांपूर्वी ब्राझील संघाला जर्मनी व नेदरलँड्सविरुद्धच्या प्रदर्शनीय सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neymar hits fifth in all time brazilian goalscoring charts
First published on: 28-03-2015 at 02:14 IST