सर्बियाचा टेनिसपटू, पण अवघ्या जगातल्या टेनिसप्रेमींच्या ह्रदयावर राज्य करणारा महान खेळाडू नोव्हाक जोकोव्हिचनं आपण का टेनिसपटूंच्या गळ्यातले ताईत आहोत, हे रविवारी पुन्हा एकदा सिद्ध केलं. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नोव्हाक जोकोव्हिचनं डॅनिल मेदवेदेवचा तीन सेटमध्ये पराभव केला. या विजयासह नोव्हाक जोकोव्हिचनं चौथ्यांदा अमेरिक ओपन स्पर्धा जिंकली असून त्याचं हे कारकिर्दीतलं तब्बल २४वं ग्रँड स्लॅम ठरलं आहे.

तब्बल १ तास ४४ मिनिटं चालला दुसरा सेट!

तीन सेटमध्ये नोव्हाक जोकोविचनं डॅनिल मेदवेदेव याचा पराभव केला. मात्र, या दोघांमध्ये झालेले तिन्ही सेट टेनिस प्रेमींच्या डोळ्यांचं पारणं फेडणारे ठरले. नोव्हाकनं त्याच्या चाहत्यांना अजिबात निराश न करता आपण जगज्जेतेपदासाठी का दावेदार आहोत? याचा नमुनाच अवघ्या जगासमोर सादर केला. पहिल्या सेटमध्ये नोव्हाकनं ६-३ असा सहज विजय मिळवत आपला क्लास दाखवून दिला. पण मेदवेदेवसाठी खरी परीक्षा दुसरा सेट ठरली!

world athletics announces cash prizes for gold medallists in paris olympics
विश्लेषण: ॲथलेटिक्स सुवर्णपदकविजेत्यांना ऑलिम्पिकमध्ये रोख पदके… हा निर्णय क्रांतिकारी कसा? मूळ नियम काय आहेत
Champions League Football Barcelona beat Paris Saint Germain sport news
चॅम्पियन्स लीग फुटबॉल: बार्सिलोनाची पॅरिस सेंट-जर्मेनवर मात
Candidates Chess Tournament D Gukesh defeated Fabiano Caruana
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा: गुकेश अपराजितच! अग्रमानांकित कारुआनाला बरोबरीत रोखले; विदित, हम्पी पराभूत
ben stoke
बेन स्टोक्सची ट्वेन्टी-२० विश्वचषकातून माघार

दुसऱ्या सेटमध्ये मेदवेदेवनं कडवी झुंज देत आपणही यूएस ओपनच्या अंतिम फेरीला साजेसा खेळ केला. पण नोव्हाकच्या अव्वल दर्जाच्या फटक्यांसमोर मेदवेदेवला अखेर शरणागती पत्करावी लागली. हा सेट टायब्रेकरमध्ये गेल्यानंतर नोव्हाकनं आपला खेळ अजून उंचावत सेट खिशात घातला. ७-६(५) असा हा सेट जिंकून जोकोविचनं आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये दमछाक झालेल्या मेदवेदेवला तिसऱ्या सेटमध्ये नोव्हाकनं ६-३ असं सहज हरवत चौथ्यांदा अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या जेतेपदावर आपलं नाव कोरलं!

“मी याची कधीच कल्पना केली नव्हती!”

दरम्यान, विजयानंतर जोकोविचनं भावनिक प्रतिक्रिया दिली. “मी कधीच कल्पना केली नव्हती की कधीतरी मी अशा प्रकारे तुमच्यासमोर उभा राहून माझ्या २४व्या ग्रँडस्लॅमविषयी बोलेन. हे कधी प्रत्यक्षात उतरेल याचा मी कधीच विचार केला नव्हता. पण गेल्या दोन वर्षांत मला असं वाटू लागलं होतं की मी हे करू शकतो. मला संधी आहे. मला इतिहास घडवण्याची संधी असेल तर मी ती का घेऊ नये?” अशी प्रतिक्रिया ३६ वर्षीय जोकोविचनं दिली.

Cincinnati Masters: अल्काराजचा पराभव केल्यानंतर जोकोविच ढसाढसा रडला, विम्बल्डनच्या ‘त्या’ सामन्याचं आहे खास कनेक्शन

…आणि जोकोविचनं इतिहास घडवला!

एकीकडे आपल्या कारकिर्दीतलं २४वं ग्रँडस्लॅम पटकावताना नोव्हाक जोकोविचनं मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. आत्तापर्यंत जोकोविच व सेरेना विल्यम्स हे २३ ग्रँडस्लॅमसह बरोबरीत होते. मात्र, रविवारच्या विजयानंतर आता तब्बल २४ ग्रँडस्लॅम नावावर असणारा नोव्हाक जोकोविच हा जगातला एकमेव टेनिसपटू ठरला आहे. याआधी मार्गारेट कोर्ट यांनीह २४ पदकं पटकावली होती. पण त्यातली १३ पदकं ही त्यांना ‘ग्रँडस्लॅम’ म्हणून मान्यता मिळण्याआधी जिंकली होती.