जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या नोव्हाक जोकोव्हिचचा यशोशिखरापर्यंतचा प्रवास लघुपटाच्या माध्यमातून उलगडणार आहे. आतापर्यंत चाहत्यांना माहिती नसलेल्या गोष्टी जोकोव्हिच या लघुपटामध्ये मांडणार आहे. युद्धग्रस्त सर्बियातील सुरुवातीचा प्रवास, प्रशिक्षक जेलेना जेनकिक यांची भूमिका, ग्रँडस्लॅम स्पर्धेतला अनुभव अशा गोष्टींविषयी जोकोव्हिच आपले अनुभव चाहत्यांसाठी खुले करणार आहे. मी कसा घडलो हे चाहत्यांसमोर मांडण्याची लघुपटाने संधी दिली. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पाश्र्वभूमीवर ही लघुपटांची मालिका प्रक्षेपित होणार आहे. ऑस्ट्रेलियातील जेकब्स क्रीक या कंपनीने लघुपटाची निर्मित्ती केली आहे. या लघुपटाची माहिती देणाऱ्या मेड बाय या व्हिडिओचे अनावरण सोमवारी जोकोव्हिचने केले.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Dec 2014 रोजी प्रकाशित
जोकोव्हिचची कहाणी लघुपटाद्वारे उलगडणार
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या नोव्हाक जोकोव्हिचचा यशोशिखरापर्यंतचा प्रवास लघुपटाच्या माध्यमातून उलगडणार आहे.
First published on: 03-12-2014 at 12:06 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Novak djokovic to reveal life story in short film series