जागतिक तिरंदाजी स्पध्रेसाठी भारतीय संघातून ऑलिम्पिकपटूंना वगळले

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणारा एकही तिरंदाज या निवड चाचणीत यशस्वी होऊ शकला नाही.

सोनीपत : पुढील महिन्यात होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद तिरंदाजी स्पध्रेसाठी गुरुवारी भारतीय संघ जाहीर करण्यात आले असून, यात टोक्यो ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणारा एकही तिरंदाज या निवड चाचणीत यशस्वी होऊ शकला नाही.

ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चार तिरंदाजांपैकी एकालाही टोक्योहून परतल्यावर तीन दिवसांनी झालेल्या निवड चाचणीत अव्वल तिघांमध्ये क्रमांक मिळवता आला नाही. दीपिका कुमारीला तिच्या गटात चौथा क्रमांक मिळाला, तरुणदीप रायला नववा, अतानू दासला १७वा आणि प्रवीण जाधवला २०वा क्रमांक मिळाला.

संघ : रीकव्‍‌र्ह – पुरुष : आदित्य चौधरी, पार्थ साळुंखे, अतुल वर्मा; महिला : कोमलिका बारी, रिद्धी, अंकिता भकट

कंपाऊंड – पुरुष : अभिषेक वर्मा, संगम सिंग बिस्ला, ऋषभ यादव; महिला : मुस्कान किरण, ज्योती सुरेख व्हेन्नम, प्रिया गुजर

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Olympic athletes excluded from indian squad for the world archery championships zws

ताज्या बातम्या