आनंदने पुन्हा निराशा केली

विश्वविजेता ग्रँडमास्टर आनंद बíलनसारखा अभेद्य बचाव केल्यावर आव्हानवीर मॅग्नस कार्लसनला मनातून अतोनात आनंद झाला असेल पण त्याच वेळी आनंदचे चाहते हिरमुसले झाले असतील.

विश्वविजेता ग्रँडमास्टर आनंद बíलनसारखा अभेद्य बचाव केल्यावर आव्हानवीर मॅग्नस कार्लसनला मनातून अतोनात आनंद झाला असेल पण त्याच वेळी आनंदचे चाहते हिरमुसले झाले असतील. कारण बíलन या स्पॅनिशच्या प्रकारात काळ्या मोहऱ्याकडून जिंकण्याचे प्रमाण फारच कमी आहे. पांढऱ्याने जर जिंकायचा खूप प्रयत्न केला तरच काळ्या मोहऱ्या ना जिंकायची संधी असते किंवा काळा खेळाडू पांढऱ्यापेक्षा फारच चांगला असेल तर!
‘‘मी सिसिलियनसारखे धारदार शस्त्र वापरले असते तरी त्याच्याकडे ते बोथट करणारे प्रकार असतीलच,’’ अशा शब्दात आनंदने सारवासारव करण्याचा प्रयत्न डाव संपल्यावर पत्रकार परिषदेत केला. आता आनंद आपली निराश मन:स्थिती लपवण्याचा प्रयत्नही करीत नाही.
‘‘कोणी आता वजीर फुकट दिला तरच मला झोपेतून उठवा,’’ अशी मार्मिक टिप्पणी ग्रँडमास्टर अकोबियानने केली; इतका आजचा डाव रटाळ झाला. सामन्यावर पूर्ण पकड घेतलेला मॅग्नस आता जराही धोका पत्करत नाही. धोका पत्करण्याची जबाबदारी आता जगज्जेत्याची आहे याची त्याला पूर्ण जाणीव आहे. त्याचप्रमाणे तरुण आव्हानवीर उतावळेपणा पण दाखवत नाही. त्याचा आत्मविश्वास पण वाखाणण्यायोग्य आहे. आज पहिल्या २० चाली त्याने अवघ्या १० मिनिटात संपवल्या.
ग्रँडमास्टर व्लादिमिर चुचेलोव मागे मला म्हणाला होता की पटावर किंवा पटाबाहेर काहीही परिस्थिती असो, मॅग्नस कार्लसन हा सर्वोत्तम खेळ्याच देतो. त्याच्या शरीरात बर्फाचे पाणी वाहते की काय असे वाटण्याइतका तो निर्विकार असतो. आजचा मॅग्नसचा खेळ पाहता चुचेलोवसारख्या महान प्रशिक्षकाचे निरीक्षण किती अचूक आहे हे कळते.
आता आनंदकडे वेळ फारच कमी उरला आहे. पण त्याच्या दृष्टीने पाहता त्याला सावरण्यासाठी काही दिवसांचा अवधी हवाच होता. आजचा विश्रांतीचा दिवस पकडून आनंदकडे चार दिवस होते. आणि मॅग्नस कितीही थंड असला तरी त्यालाही मनात नको नको ते विचार येत असणारच! त्यामुळे एक धक्का त्याला हादरवून टाकायला पुरेसा होईल. फक्त प्रश्न आहे की त्याला धक्का देण्याचे सामथ्र्य आनंद आपल्या खेळात आणू शकेल का?  आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहेच ,‘‘वाघ म्हटले तरी खातोच, वाघोबा म्हटले तरी खातोच. मग वाघ्याच का म्हणू नये?’’ आनंदला आता मॅग्नसला वाघ्या म्हणण्याची वेळ जवळ आली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Once again viswanathan anand disappointed