ऑस्कर पिस्टोरिअसची पॅरोलवर सुटका

दक्षिण आफ्रिकेचा पॅरालिम्पिकपटू ऑस्कर पिस्टोरिअस याची बुधवारी पॅरोलवर सुटका करण्यात आली.

दक्षिण आफ्रिकेचा पॅरालिम्पिकपटू ऑस्कर पिस्टोरिअस याची बुधवारी पॅरोलवर सुटका करण्यात आली. २०१३मध्ये प्रेयसी रिवा स्टीनकॅम्पच्या हत्येप्रकरणी पिस्टोरिअसला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पिस्टोरिअसने व्हॅलेंटाइनच्या दिवशी स्टीनकॅम्पची राहत्या घरी गोळी घालून हत्या केली होती. मात्र, घुसखोर घुसल्याच्या संशयातून ही घटना घडल्याचा दावा पिस्टोरिअसने केला होता. काही सुधारित अटींवर त्याची सुटका करण्यात आली आहे आणि त्याला पुढील शिक्षा राहत्या घरी नजरकैदेत पूर्ण करावी लागणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Oscar pistorius released from prison

ताज्या बातम्या