ICC ODI World Cup 2023: या वर्षाच्या शेवटी भारतात होणार्‍या एकदिवसीय विश्वचषकाच्या अधिकृत वेळापत्रकाची सर्व क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत. आशिया चषकाबाबत बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) यांच्यातील वादावर तोडगा निघाल्यानंतर आता विश्वचषकाबाबतही सर्व काही स्पष्ट होईल, अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र आता पीसीबीचे अध्यक्ष नजम सेठी यांनी आपल्या वक्तव्याने सर्वांनाच चकित केले. पीसीबीमुळेच विश्वचषकाचे वेळपत्रकास उशीर होत आहे असे म्हणत बीसीसीआयने संताप व्यक्त केला.

आयसीसी विश्वचषक २०२३चे वेळापत्रक जाहीर करण्यावरून BCCI आणि PCB यांच्यात मतभेद आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आपल्या गरजेनुसार वेळापत्रकात बदल करायचे आहेत, त्यामुळेच वेळापत्रक जाहीर होण्यास उशीर होत आहे. सातत्याने होत असलेल्या विलंबाने बीसीसीआय वैतागले असून त्यांनी पीसीबीला चांगलेच फैलावर घेतले. सुरुवातीला WTC फायनलनंतर वेळापत्रक जाहीर केले जाईल असे ठरले होते. मात्र, आता पुढील आठवड्यात वेळापत्रक जाहीर होईल असे दिसते. इनसाइडस्पोर्टशी बोलताना बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने वेळापत्रकाला उशीर झाल्याबद्दल निराशा व्यक्त केली.

Former Zimbabwean cricketer Guy Whittle
Guy Whittall : धक्कादायक! माजी क्रिकेटरवर बिबट्याचा जीवघेणा हल्ला, कुत्र्याने वाचवला जीव, रक्ताने माखलेला फोटो व्हायरल
Will MS Dhoni play in T20 World Cup 2024
Team India : एमएस धोनी टीम इंडियात परतणार? टी-२० विश्वचषकाबाबत ‘या’ माजी खेळाडूंचा मोठा दावा
IPL 2024 Chennai Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर सॅम करनने केली रिव्ह्यूची मागणी, करनच्या चतुराईमुळे असा बाद झाला राहुल त्रिपाठी; पाहा VIDEO
Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals Updates
KKR vs RR : कोलकातामध्ये आरआर आणि केकेआर यांच्यातील सामन्यात होऊ शकतो बदल, जाणून घ्या काय आहे कारण?

गेल्या आठवड्यात, आयसीसीने एक वेळापत्रकाचा मसुदा बीसीसीआय आणि पीसीबीला पाठवला होता, त्यावर आपला अभिप्राय देण्यास सांगितलेही होते. भारताने त्या वेळापत्रकाच्या मसुद्यावर कोणताही आक्षेप नाही असे कळवले. मात्र, पीसीबीने आपल्या मॅचअपमध्ये दोन मोठे बदल करण्याची विनंती केली आहे ज्यामुळे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यास आणखी विलंब होत आहे.

हेही वाचा: ENG vs AUS: “आधी असे कसोटी सामने पाहिले नव्हते पण…”, माजी कर्णधार पाँटिंगचे बेन स्टोक्सच्या कॅप्टन्सीवर सूचक विधान

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्टसला सांगितले की, “पाकिस्तानच्या आडमुठेपणामुळेच वर्ल्डकपच्या वेळपत्रकाला उशीर होत आहे. पीसीबी त्यांना हवे ते सांगू शकते. पण वस्तुस्थिती अशी आहे की वेळापत्रक जाहीर होण्यास उशीर होण्यास पीसीबी जबाबदार आहे. पूर्वी पाकिस्तान अहमदाबादमध्ये खेळायला तयार नव्हता, आता चेन्नईत खेळायला तयार नाही. त्यांना सर्वच ठिकाणी असुरक्षितता वाटते, ते नेहमीच दुसऱ्याला त्रास देतात.”

सुरक्षेच्या कारणास्तव अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताचा सामना होणार नाही यावर पीसीबी सुरुवातीपासूनच ठाम होते. त्याऐवजी त्यांना चेन्नईच्या नवीन स्टेडीयममध्ये भारताविरुद्ध खेळायचे आहे. मात्र, मसुदा वेळापत्रक मिळाल्यानंतर, पाकिस्तानने आता बीसीसीआयला त्यांच्या अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्याचे ठिकाण चेन्नईहून बदलण्याची विनंती केली आहे.

हेही वाचा: ENG vs AUS: मार्नस लाबुशेनने पकडलेला झेल वादाच्या भोवऱ्यात, चाहते म्हणतात, “ऑस्ट्रेलिया रडीचा डाव…”, पाहा video

“पाकिस्तान क्रिकेट संघाला चेन्नईतील फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर अफगाणिस्तान संघाविरुद्ध खेळायचे नाही कारण आम्हाला ते सोयीस्कर होणार नाही”, असा दावा पीसीबीने केला आहे. दुसरीकडे, पीसीबीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या त्यांच्या सामन्याचे ठिकाण बदलून बंगळुरूमध्ये करण्याची मागणी केली आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, पीसीबीला बंगळुरूमध्ये अफगाणिस्तान आणि चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलिया आणि भारताविरुद्ध सामने खेळायचे आहेत. मात्र, बीसीसीआयने ही विनंती फेटाळून लावली आणि आता आयसीसी या प्रक्रियेत मध्यस्थी करत आहे.