Paris Olympics 2024 massive distance between Archers and Targets : सध्या जगभरात पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेचा धुमाकूळ सुरु आहे. या स्पर्धेत आतापर्यंत भारताने तीन कांस्यपदकं जिंकली आहेत. ही तिन्ही पदकं नेमबाजाती आली आहे. मात्र, काल दीपिका कुमारीकडून भारताला तिरंदाजीत पदकाची आशा होती, परंतु या खेळाता भारताच्या पदरी निराशा आली. आता तिरंदाजी इव्हेंटमध्ये लक्ष्य आणि स्पर्धकांमधील प्रचंड अंतर दर्शविणाऱ्या एका व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यावर युजर्स देत असलेल्या प्रतिक्रिया लक्ष वेधून घेत आहेत.

भारताच्या अनुभवी तिरंदाज दीपिका कुमारी आणि भजन कौर शनिवारी महिलांच्या वैयक्तिक गटात आव्हान सादर करण्यासाठी आल्या होत्या. उपांत्यपूर्व फेरीत भजन कौर इंडोनेशियाच्या चोरुनिसा डायंडाविरुद्ध पराभूत झाली, तर दीपिकाने अंतिम-१६ फेरीत जर्मनीच्या मिशेल क्रॉपेनचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मात्र, गेल्या आठ सामन्यांमध्ये आघाडी घेतल्यानंतरही दीपिकाला पराभवाला सामोरे जावे लागले.

Fan came inside the stadium to meet Babar Azam
बाबर आझमला भेटायला आला चाहता, हारिस रौफने पाहिलं आणि…. VIDEO व्हायरल
SYMBIOSEXUAL
तुम्ही सुद्धा ‘Symbiosexual’ आहात का? ही नवीन लैंगिक ओळख नेमकी काय आहे? इंटरनेटवर याची इतकी चर्चा का?
Super Typhoon Yagi Videos
Super Typhoon Yagi: खिडक्या आणि गाड्या उडाल्या, झाडं-घरं कोलमडली; चक्रीवादळाच्या तडाख्यात व्हिएतनाममध्ये हाहाकार
Duleep Trophy 2024 Rishabh Pant joins Shubman Gill lead A team
ऋषभने आपल्या कृतीने जिंकली पुन्हा चाहत्यांची मनं, विरोधी संघाची रणनीती जाणून घेण्यासाठी केलं असं काही की…
broken footboard on the Udupi to Karkala KSRTC bus how to board the bus Watch Viral Video
‘बाई…हा काय प्रकार!’ बसच्या तुटक्या पायऱ्या पाहून काळजात भरेल धडकी, बसमध्ये चढायचे कसे? पाहा Viral Video
Naveen Ul Haq Teased with Virat Kohli video
Naveen Ul Haq Virat Kohli : विराट कोहलीच्या रील्समुळे नवीन उल हक वैतागला, VIDEO होतोय व्हायरल
Vinesh Phogat Faints During Celebrations in Hometown of Balali Due to Exhaustion Video Viral
Vinesh Phogat: थकलेल्या विनेश फोगटला गावातील सत्कार समारंभादरम्यान आली चक्कर, VIDEO होतोय व्हायरल
Javelin thrower Neeraj Chopra opinion on 90 m distance debate sport news
अंतराबाबतची चर्चा आपण देवावर सोडूया! ९० मीटरच्या टप्प्याबाबत भालाफेकपटू नीरज चोप्राचे मत

दीपिका-भजनचे आव्हान संपुष्टात –

दीपिकाने पहिला सेट २८-२६ असा जिंकला होता, तर कोरियाच्या सु येओनने दुसऱ्या सेटमध्ये दीपिकाचा २८-२५ असा पराभव केला होता. यानंतर दीपिकाने तिसरा सेट २९-२८ अशा फरकाने जिंकला, तर सु येऑनने चौथ्या सेटमध्ये पुनरागमन करत हा सेट २९-२७ असा जिंकला आणि ४-४ अशी बरोबरी साधली. निर्णायक सेटमध्ये दीपिका मागे पडली आणि सु येऑनने हा सेट २९-२७ असा जिंकला आणि दीपिकाला ६-४ अशा फरकाने पराभूत केले. अशाप्रकारे दीपिकाचा प्रवास उपांत्यपूर्व फेरीतच संपला.

हेही वाचा – KL Rahul Athiya विकतायत धोनी-कोहलीसारख्या खेळाडूंचे क्रीडा साहित्य, कारण जाणून कराल सलाम

तिरंदाजी मैदानाचा व्हिडीओ व्हायरल –

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिरंदाजी स्पर्धा सुरू झाल्यानंतर सुमारे एक आठवड्यानंतर, एका चाहत्याने तिरंदाजी मैदानाच्या संपूर्ण आकाराचा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत चाहत्याने प्रथम स्पर्धकांना दाखवले. जे गडद निळ्या रंगमंचावर एका विशाल वर्तुळात उभे असलेले दिसतात. यानंतर कॅमेरा हळू हळू विरुद्ध बाजूला असलेल्या दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर दूर असलेल्या लक्ष्यांकडे फिरवला आणि दोन्ही टोकांमधील प्रचंड अंतर अधोरेखित केले. यावर त्याने लिहिले की, “ऑलिंपिक तिरंदाजीचे लक्ष्य किती दूर आहे, हे कळल्यावर इतर कोणालाही धक्का बसेल.”

हेही वाचा – Paris Olympics 2024 : भारतात पदक विजेत्या खेळाडूंना किती रक्कम मिळते, कोणत्या देशात दिले जाते सर्वाधिक बक्षीस? जाणून घ्या

आता हा व्हिडीओ मोठ्या व्हायरल झाला असून, तो आतापर्यंत खूप लोकांनी पाहिला आहे. यावर लोक त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. त्यांच्यापैकी एकाने लिहिले, ‘मला वाटतं होतं की मी पण तिरंदाजी करु शकतो.

पण आता प्रत्यक्षात अंतर पाहून वाटते हा खेळ सोपा नाही.ऑलिम्पिक हे खेळाचे एक उत्तम उदाहरण आहे. कारण आपल्यापैकी ९९ टक्के लोक लक्ष्य गाठूही शकत नाहीत. मग अचूक लक्ष्यावर निशाणा साधणे तर खूप लांबची गोष्ट आहे.’