प्रो कबड्डी लीगच्या (पीकेएल) आठव्या हंगामासाठी २९ ऑगस्टला खेळाडूंची लिलाव प्रक्रिया सुरू झाली. लिलावाच्या पहिल्या दिवशी नवीन युवा खेळाडूंचा (NYP) लिलाव झाला, पण १२ संघांनी या खेळाडूंमध्ये फारसा रस दाखवला नाही. लिलावाच्या पहिल्या दिवशी फक्त चार खेळाडू खरेदी करण्यात आले.

आता सर्वांच्या नजरा आज म्हणजेच ३० ऑगस्ट रोजी होणाऱ्या लिलावाच्या दुसऱ्या दिवशी असतील. आज प्रथम परदेशी खेळाडूंचा लिलाव केला जाईल आणि नंतर ए श्रेणीतील खेळाडूंचा संध्याकाळी साडेसहा वाजल्यापासून लिलाव केला जाईल. या खेळाडूंमध्ये प्रदीप नरवाल, राहुल चौधरी, दीपक हुडा, रोहित कुमार, नितीन तोमर यांसारख्या खेळाडूंचा समावेश असेल.

How to Make Home Made Instant Chilli Rice Dhokla with Leftover Rice Not The Tasty And Quick Recipe
रात्री उरलेल्या भाताचे काय करायचं असा प्रश्न पडलाय ? मग ‘हा’ पदार्थ बनवून पाहा; झटपट होणारी रेसिपी लगेच नोट करा
Operation Nanhe Farishte 1064 children were rescued
‘ऑपरेशन नन्हे फरिश्‍ते’ काय आहे माहितीये का? मायेला मुकलेल्या चिमुकल्यांना…
fraud of 21 lakhs by promising huge investment returns
नवी मुंबई : गुंतवणुकीतून भरघोस परताव्याचे आमिष दाखवून २१ लाखांची फसवणूक 
Pune Police Arrest Nigerian Woman in Mumbai for Mephedrone Smuggling
मेफेड्रोन तस्करी प्रकरणात पुणे पोलिसांची कामगिरी; मुंबईत नायजेरियन महिलेला अटक

 

लिलावापूर्वी ५९ खेळाडूंना कायम ठेवण्यात आले आहे. याशिवाय सर्व १२ संघांनी मिळून १६१ खेळाडूंना रिलीज केले आहे. या यादीत अनेक बड्या खेळाडूंची नावे समाविष्ट करण्यात आली असून त्यांच्या भवितव्याचा निर्णय फक्त आज होणार आहे. लिलावातील सर्व संघांना फायनल बिड मॅच कार्डचा (FBM) पर्याय असेल, ज्याचा वापर करून ते त्यांच्या संघातून रिलीज केलेल्या काही खेळाडूंचा समावेश करू शकतात.

पुणेरी पलटणने लिलावाच्या पहिल्या दिवशी दोन खेळाडू खरेदी केले, तर यूपी योद्धा आणि तेलुगू टायटन्सने प्रत्येकी एक खेळाडू खरेदी केला. लिलावाच्या पहिल्या दिवशी मोहित गोयत, नितीन पंवार, प्रिन्स आणि गोविंद गुर्जर यांना खरेदी केले. मात्र, यांच्यावर किती बोली लागली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

हेही वाचा – पॅरालिम्पिक : थाळीफेकपटू विनोद कुमारचं कांस्यपदक रोखलं; वाचा नक्की प्रकरण काय

कुठे पाहता येणार हा लिलाव?

स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर सायंकाळी साडेसहापासून हा लिलाव थेट प्रसारित केला जाईल. या सत्रात ‘ए’ श्रेणीतील खेळाडूंचा लिलाव केला जाईल आणि तुम्ही डिस्ने+हॉटस्टारवर या लिलावाचे थेट प्रक्षेपण देखील पाहू शकता.

पहिल्या दिवशी खरेदी केलेल्या खेळाडूंची यादी:

  • मोहित गोयत (पुणेरी पलटन)
  • गोविंद गुर्जर (पुणेरी पलटन)
  • राजकुमार (तेलुगू टायटन्स)
  • नितीन पंवार (यूपी योद्धा)