Pro Kabaddi 2018 : बंगळुरु बुल्सने तामिळ थलायवाजवर ४४-३५ च्या फरकाने विजय मिळवला. तामिळ थलायवाजचा हा सलग पाचवा पराभव आहे.  बंगळुरु बुल्सकडून पवन सेहरावत आणि काशिलींग अडके यांनी चढाईत भरघोस गुणांची कमाई करत तामिळ थलायवाजला सामन्यात पुनरागमन करण्याची एकही संधी दिलीच नाही. बंगळरूसाठी पवन सेहरावतने १६ गुण तर काशिलिंग अडकेने १२ गुण मिळवत संघाला विजय मिळवून दिला. सहाव्या सत्रामध्ये बंगळुरु बुल्सचा तामिळ थलायवजवर दुसरा विजय आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या सत्रामध्ये तामिळ थलायवाज संघाचा सलग पाचव्यांदा पराभवाचा सामना करावा लागला. थलायवाजने पहिल्या सामन्यात पाटना पायरटेस विरोधात  एकमेव विजय मिळवला आहे. कर्णधार अजय ठाकुरने शानदार प्रदर्शन करत संघाला मानहानीकारक पराभवापासून वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अन्य खेळाडूने मदत न मिळाल्यामुळे संघाला पराभवचा सामना करावा लागला.

सामन्यात पहिल्या सत्रापासून बंगळुरु बुल्सच्या चढाईपटूंनी तामिळ थलायवाजवर दबाव टाकण्यास सुरुवात केली. पवन शेरावतने तामिळच्या बचावफळीला खिंडार पाडलं. दुसरीकडे तामिळ थलायवाज संघाच्या बचावपटूंनी आज निराशाजनक खेळ केला. मनजीत छिल्लर, अमित हुडा यासारख्या अनुभवी खेळाडूंना आज आपली छाप पाडता आली नाही. चढाईत कर्णधार अजय ठाकूरने चांगले गुण मिळवले, मात्र अन्य बचावपटूंची साथ न लाभल्यामुळे तामिळ थलायवाजला हार पत्करावी लागली.

सामन्यात बेस्ट रायडर म्हणून पवन सेहरावतची निवड करण्यात आली. पवनने १४ चढाईत १४ गुणांची कमी केली. आशीष सांगवानला डिफेंडर ऑफ द मॅच म्हणून निवडण्यात आले.

मराठीतील सर्व pro kabaddi league बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pro kabaddi 2018 bengalurubulls beat tamil thalaivas
First published on: 18-10-2018 at 00:09 IST