इंटर झोन चॅलेंज प्रकारात यू मुम्बाकडून पराभव स्विकारल्यानंतर पाटणा पायरेट्स संघाला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. हरयाणा स्टिलर्स संघाने पाटणा पायरेट्सवर 43-32 ने मात केली, आजच्या सामन्यात हरयाणाच्या बचावफळीने केलेला भक्कम खेळ हे त्यांच्या विजयाचं प्रमुख कारण ठरलं.

मोनू गोयतच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या हरयाणा संघाने आज अतिशय सुरेख खेळ केला. बदली कर्णधार विकास कंडोलाने चढाईची धुरा आपल्या खांद्यावर सांभाळत पाटण्याच्या बचावफळीचं कंबरडं मोडलं. त्याला नवीननेही चांगली साथ दिली. पहिल्या सत्रात दोन्ही संघामध्ये चांगली चढाओढ पहायला मिळाली, मात्र हरयाणाने पिछाडी भरुन काढत मध्यांतरापर्यंत 17-15 अशी आघाडी घेतली.

अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 6 : अटीतटीच्या लढाईत उत्तर प्रदेशची दिल्लीवर मात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसऱ्या सत्रात हरयाणाच्या बचावपटूंनी पाटण्याचं आक्रमण पूर्णपणे मोडीत काढलं. प्रदीप नरवाल, विजय यांनी चढाईत चांगल्या गुणांची कमाई केली. मात्र विकास काळेचा अपवाद वगळता त्याला एकाही बचावपटूने चांगली साथ दिली नाही. दुसऱ्या सत्रात हरयाणाच्या खेळाडूंनी पाटण्याच्या याच कमकुवत बचावाचा फायदा घेत सामन्यावर आपली पकड मजबूत ठेवली. घरच्या मैदानावर पाटणा पायरेट्सचा हा दुसरा पराभव ठरला.