Ravindra Jadeja completes 200 ODI wickets: आशिया कप २०२३ मध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यातील सुपर फोर फेरीतील सामना कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने शमीम हुसेनला आऊट करत एक खास पराक्रम केला आहे. तो अनिल कुंबळे आणि जवागल श्रीनाथसारख्या दिग्गजांच्या खास यादी सामील झाला आहे.

बांगलादेशला ३५व्या षटकात रवींद्र जडेजाने १६१ धावांवर सहावा धक्का दिला. रवींद्र जडेजाने शमीम हुसेनला एलबीडब्ल्यू आऊट केले. त्याला एक धाव करता आली. या विकेटसह जडेजाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये २०० विकेट्स पूर्ण केले आहेत. हा टप्पा गाठणारा तो सातवा भारतीय गोलंदाज ठरला आहे. याआधी अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ, अजित आगरकर, झहीर खान, हरभजन सिंग आणि कपिल देव यांनी ही कामगिरी केली आहे.

PAK vs BAN Mohammed Rizwan Broke Rishabh Pant and Andy Flower Record
PAK vs BAN: मोहम्मद रिझवानने मोडला ऋषभ पंतचा विक्रम, पराभूत कसोटी सामन्यात ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला पाकिस्तानी यष्टिरक्षक
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Bangladesh beat Pakistan by 10 Wickets 1st Time history of Test Cricket
PAK vs BAN: पाकिस्तानचा घरच्या मैदानावर लाजिरवाणा पराभव, कसोटी क्रिकेटच्या इतिहासात बांगलादेशने पहिल्यांदा मिळवला विजय
ICC Test Ranking Updates Indian Players Ravindra Jadeja and R Ashwin Table Topper
ICC Test Rankings: ICC ने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत भारताच्या खेळाडूंचा दबदबा, अश्विन-जडेजा पहिल्या स्थानी तर रोहित-विराट…
Keshav Maharaj bowled 40 consecutive overs in the WI vs SA 1st test match
Keshav Maharaj : केशव महाराजने केला मोठा पराक्रम, कसोटीत ‘ही’ कामगिरी करणारा ठरला जगातील दुसरा गोलंदाज
Virat Kohli fights with Asitha Fernando video viral during India vs Sri Lanka 3rd ODI
IND vs SL : असिता फर्नांडोने विराट कोहलीशी घेतला पंगा, अन् सामन्यानंतर… VIDEO व्हायरल
Rohit Sharma reaction on ODI series defeat against Sri Lanka
IND vs SL ODI : ‘मी कर्णधार असताना असं घडण्याची…’, श्रीलंकेविरुद्धची मालिका गमावल्यानंतर रोहित शर्माच मोठं वक्तव्य
Rohit Sharma became fourth highest run scorer for india in odi cricket
IND vs SL 2nd ODI : रोहित शर्माने राहुल द्रविडला मागे टाकत केला मोठा पराक्रम, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला चौथा भारतीय

टीम इंडियासाठी वनडे क्रिकेटमध्ये दोनशे किंवा त्याहून अधिक विकेट्स घेणारे गोलंदाज –

अनिल कुंबळे (३३७)
जवागल श्रीनाथ (३१५)
अजित आगरकर (२८८)
झहीर खान (२८२)
हरभजन सिंग (२६९)
कपिल देव (२५३)

हेही वाचा – SA vs AUS: विश्वचषक २०२३ पूर्वी दक्षिण आफ्रिकेला बसले दोन मोठे धक्के, कर्णधारासह ‘या’ स्टार गोलंदाजाला झाली दुखापत

रवींद्र जडेजाचा कपिल देवच्या खास क्लबमध्ये प्रवेश –

एकदिवसीय क्रिकेटमध्ये २००० धावा आणि २०० बळी घेणारा रवींद्र जडेजा हा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्यांच्या आधी हा पराक्रम फक्त कपिल देवच करू शकले होते. शमीम हुसेन जडेजाचा चेंडू पूर्णपणे समजून घेण्यात अपयशी ठरला आणि विकेटसमोर एलबीडब्ल्यू आऊट झाला. शमीमने रिव्ह्यूचाही वापर केला, पण तो निर्णय बदलू शकला नाही.

हेही वाचा – IND vs BAN: टीम इंडियाच्या खेळाडूंना पाणी घेऊन जाताना किंग कोहलीने अस काही केलं की… विराटचा हा VIDEO पाहून तुम्हाला ही येईल हसू

रवींद्र जडेजाची वनडे कारकीर्द –

रवींद्र जडेजाने २००९ मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. जडेजाने भारतासाठी आतापर्यंत १८१ एकदिवसीय सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने फलंदाजीत २५७८ धावा केल्या आहेत. जड्डूने १३ अर्धशतके केली आहेत. यासोबतच जडेजाने गोलंदाजीत २०० विकेट्स घेतल्या आहेत.