नऊ सामन्यांतील गोलचा दुष्काळ संपवून गॅरेथ बॅलेने दोन गोलसह रिअल माद्रिद संघाला ला लीगा स्पध्रेत विजयपथावर नेल़े त्याच्या या दोन गोलच्या बळावर माद्रिदने २-० अशा फरकाने लेव्ॉन्टे संघाचा पराभव केला़ सलग तीन लढतींत विजयाची चव चाखण्यात अपयशी ठरलेल्या माद्रिदने या विजयासह स्पध्रेतील आव्हान जिवंत ठेवले आह़े त्यांची पुढील लढत बार्सेलोनाविरुद्ध होणार आह़े १८व्या मिनिटाला बॅलेने संघाला पहिला गोल करून दिला़ ४०व्या मिनिटाला दुसऱ्या गोलची नोंद करून मध्यंतरालाच माद्रिदने २-० अशी आघाडी घेतली होती़ माद्रिदने अखेपर्यंत ही आघाडी कायम राखून विजय संपादन केला़
संग्रहित लेख, दिनांक 17th Mar 2015 रोजी प्रकाशित
बॅलेमुळे माद्रिद विजयी पथावर
नऊ सामन्यांतील गोलचा दुष्काळ संपवून गॅरेथ बॅलेने दोन गोलसह रिअल माद्रिद संघाला ला लीगा स्पध्रेत विजयपथावर नेल़े

First published on: 17-03-2015 at 03:13 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Real madrid won due to gareth bale wonder goal