16 October 2019

News Flash

सचिनच्या हस्ते पी.व्ही.सिंधूला मिळणार बीएमडब्ल्यू

क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च समजल्या जाणाऱया राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला

रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाची कमाई करणारी भारताची बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू हिला माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या हस्ते बीएमडब्ल्यू कार बक्षिस म्हणून दिली जाणार आहे. येत्या २८ ऑगस्ट रोजी हैदराबादमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. याआधी चार वर्षांपूर्वी लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱया सायना नेहवालला सुद्धा सचिनच्या हस्ते बीएमडब्ल्यू कार भेट देण्यात आली आहे. त्यावेळी १९ वर्षाखालील आशियाई स्पर्धेत विजेतेपद पटकावणाऱया पी.व्ही.सिंधूला देखील सचिनच्या हस्ते स्विफ्ट कार देऊन सन्मान करण्यात आला होता. नुकतेच पी.व्ही.सिंधूला क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च समजल्या जाणाऱया राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय, तिच्यावर बक्षिसांचा वर्षाव देखील सुरू आहे. तिची आज ओपन बसमधून जंगी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी तिच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. पी.व्ही.सिंधूला बक्षिस म्हणून बीएमडब्ल्यू कार देण्यात येणार असल्याची घोषणा हैदराबादच्या बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष व्ही.चामुंडेश्वरनाथ यांनी केली असून, ती येत्या २८ ऑगस्ट रोजी सचिन तेंडुलकरच्या हस्ते दिली जाईल, असेही सांगितले आहे.

First Published on August 22, 2016 8:23 pm

Web Title: sachin tendulkar to present pv sindhu with a bmw car