भारताची जिमनॅस्ट दीपा कर्माकर आणि धावपटू ललिता बाबर यांच्या नावाने ट्रेन आणि विमानसेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याने सरकारकडे केली आहे. सेहवागने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे ही विनंती केली. प्रत्येकजण उगवत्या सुर्याला सलाम करतो. दीपा आणि ललिता यांना ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळाले नसले तरी त्यांची प्रवाहाविरुद्ध पोहण्याची जिद्द कौतुकास्पद आहे. आपण त्यांच्या या प्रयत्नांचा सन्मान केला पाहिजे, असे वीरेंद्र सेहवागने ट्विटरवरील संदेशात म्हटले आहे.
Rio 2016 : दीपा कर्माकरची ‘ती’ मागणी क्रीडा प्राधिकरणाने फेटाळली होती!
सध्या सुरू असलेल्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत दीपा कर्माकर आणि ललिता बाबर या दोघींनीही आपापल्या क्रीडाप्रकारात अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती. या दोघींनाही भारताला पदक मिळवून देण्यात अपयश आले असले तरी त्यांच्या कामगिरीचे अनेकांकडून कौतूक करण्यात आले होते. जिम्नॅस्टिक व्हॉल्ट प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱया दीपा कर्माकरचे रविवारी झालेल्या अंतिम फेरीत कांस्य पदक थोडक्यात हुकले. दीपाला अंतिम फेरीत दोन प्रयत्नांत सरासरी १५.२६६ गुणांसह क्रमवारीत चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. अवघ्या ०.१५० गुणांनी दीपाचे कांस्य पदक हुकले. तर ललिता बाबर हिला तीन हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीच्या अंतिम फेरीत अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती. रिओमध्ये अंतिम फेरीत स्थान मिळविताना ९ मिनिटे १९.७६ सेकंद वेळ नोंदवताना राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला होता.
‘सावरपाडा एक्स्प्रेस’ची ऑलिम्पिकवारी पक्की

A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
Candidates Chess Tournament R Pragyanand success in defeating Alireza Firooza sport news
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा: प्रज्ञानंदने फिरूझाला रोखले! गुकेश-विदित, हम्पी-वैशालीमध्ये पहिल्या फेरीत बरोबरी
Pooja Vastrakar's Controversial Post
पंतप्रधान मोदींची टीम वसूली टायटन्स! महिला क्रिकेटरच्या पोस्टने उडाली खळबळ, ट्रोल होताच मागितली माफी
Actor Sonu Sood made an anonymous post about trolling of Hardik Pandya
IPL 2024 : एक दिवस कौतुक करायचं, दुसऱ्या दिवशी हुर्यो उडवायची अशी वागणूक देशाच्या हिरोंना देऊ नका – सोनू सूद