मियामी (अमेरिका) : भारताच्या रोहन बोपण्णाने सर्वात वयस्क टेनिसपटू म्हणून व्यावसायिक स्पर्धा जिंकण्याची मोहीम मियामीतही कायम राखली. बोपण्णाने आपला ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एब्डेनच्या साथीने मियामी खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीचे विजेतेपद मिळवले.

अंतिम लढतीत बोपण्णा-एब्डेन जोडीने क्रोएशियाचा इवान डोडिग आणि अमेरिकेचा ऑस्टिन क्राजिसेक या जोडीचे आव्हान ६-७ (३-७), ६-३, १०-६ असे मोडून काढले.

Paris 2024 Paralympics India Medal Contenders List
Paris 2024 Paralympics: पहिली भारतीय टेबल टेनिस पदक विजेती, पॅरालिम्पिक नेमबाज चॅम्पियन, वर्ल्ड रेकॉर्ड करणारा भालाफेकपटू… ‘हे’ आहेत पॅरालिम्पिक स्पर्धेत संभाव्य पदकविजेते
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
us open 2024 djokovic gauff and sabalenka sail into us open second round
अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा : पहिल्या फेरीत मानांकितांचीच बाजी; जोकोविच, गॉफ, सबालेन्काची यशस्वी सुरुवात
Djokovic seeks a record 25th Grand Slam title.
अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून सुरुवात; विक्रमी २५व्या ग्रँडस्लॅमचे जोकोविचचे लक्ष्य
Neeraj Chopra Diamond League Live Streaming Details in Marathi
Neeraj Chopra: ऑलिम्पिकनंतर नीरज चोप्रा आज पुन्हा उतरणार मैदानात, डायमंड लीग स्पर्धा लाईव्ह कुठे, कधी आणि किती वाजता पाहता येणार?
Refusal for Training to World Record amazing story of world champion female boxer kellie harrington
प्रशिक्षणासाठी नकार ते वर्ल्ड रेकॉर्ड; जगज्जेत्या महिला बॉक्सरची अफलातून कहाणी
Pakistan Singer Ali Zafar Announced 1 Million Reward For Arshad Nadeem
Paris Olympics 2024: अर्शद नदीमला ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर १ मिलियनचे बक्षीस जाहीर, ‘या’ अभिनेत्याची मोठी घोषणा
Paris Olympics 2024 Henry Fieldman First Player in Olympic History to win Medal in Mens and Womens event
Paris Olympics 2024: एकाच खेळाडूने जिंकलं पुरूष आणि महिला स्पर्धेतील पदक, ऑलिम्पिकच्या इतिहासात प्रथमच घडली अशी घटना

हेही वाचा >>> IPL 2024 DC vs CSK: धोनी तडाख्याची झलक पण मुकेश-खलीलने दिल्लीला तारलं

गतवर्षी बोपण्णाने वयाच्या ४३व्या वर्षी इंडियन वेल्स स्पर्धा जिंकली होती आणि ‘एटीपी मास्टर्स १०००’ मानांकन स्पर्धा जिंकणारा तो सर्वात वयस्क खेळाडू ठरला होता. आता वयाच्या ४४व्या वर्षी त्याने मियामी स्पर्धेत विजेतेपद मिळवताना आपलाच विक्रम मोडीत काढला. याच वर्षी बोपण्णा-एब्डेन जोडीने ऑस्ट्रेलियन खुल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेतही विजेतेपद पटकावले होते.

आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत बोपण्णाने दुहेरीच्या एकूण ६३ अंतिम लढती खेळल्या असून, यात २६ विजेतीपदे मिळवली आहेत. एटीपी मास्टर्स मालिकेतील सर्व नऊ स्पर्धात अंतिम फेरी गाठणारा बोपण्णा हा लिएंडर पेसनंतर दुसरा भारतीय टेनिसपटू ठरला आहे.

क्रमवारीत पुन्हा अव्वल

या वर्षांच्या सुरुवातीला झालेली ऑस्ट्रेलियन खुली ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकताना बोपण्णाने दुहेरीच्या क्रमवारीत अग्रस्थान मिळवले होते. मात्र, पुढील दोन स्पर्धात कामगिरीत सातत्य न राखता आल्याने त्याची दुसऱ्या स्थानी घसरण झाली होती. परंतु मियामी स्पर्धेतील जेतेपदानंतर त्याने अग्रस्थान पुन्हा काबीज केले आहे. विशेष म्हणजे, बोपण्णा आणि एब्डेनचे समान गुण आहेत. त्यामुळे हे दोघे संयुक्तरीत्या अग्रस्थान मिळवणार आहेत.