Rohit sharma Dance viral video with wife and mother in law: रोहित शर्मा सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. पण काही ना काही कारणांमुळे तो चर्चेचा विषय मात्र ठरतो. हिटमॅनने टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असून तो वनडे क्रिकेट सामने खेळताना दिसणार आहे. यादरम्यानच रोहित शर्मा त्याच्या डान्समुळे चर्चेत आला आहे. रोहितचा त्याची पत्नी आणि सासूबरोबर डान्स करतानाचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.
रोहित शर्मा सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर असला तरी त्याने आयसीसी क्रमवारीत मात्र आपला दबदबा कायम राखला आहे. रोहित शर्मा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अखेरचा खेळताना दिसला होता. जिथे हिटमॅनने चांगली कामगिरी होती. याचातच फायदा रोहितला वनडे क्रमवारीत झाला आहे. रोहित शर्मा वनडेमधील जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाेत्कृष्ट फलंदाज ठरला आहे.
आयसीसी वनडे क्रमवारी जाहीर झाल्यानंतर रोहित शर्माच्या डान्सचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. या व्हीडिओमध्ये सरावादरम्यान आणि मग स्टेजवर डान्स करताना असे दोन भाग आहेत. या व्हीडिओ रोहित पत्नी रितिका सजदेह आणि सासूबरोबर डान्स करत आहे. ‘पंजाबी वेडिंग साँग’ या गाण्यावर तिघांनी डान्स केला आहे.
विसरभोळा रोहित शर्मा! डान्स करताना स्टेपही विसरला…
हा डान्स व्हीडिओ रितिका सजदेहचा सख्खा भाऊ कुणाल सजदेहच्या लग्नातील आहे. कुणालचं लग्न २०२३ मध्ये झालं होतं. कुणालच्या लग्नाच्या संगीतसाठी हा डान्स कोरियाग्राफर करण्यात आला होता. कुणाल सजदेहची पत्नी या व्हीडिओमध्ये त्यांना चिअर करतानाही दिसत आहे. कोरियाग्राफ करतानाच्या स्टेप्स आणि स्टेजवरचा डान्स असा हा व्हीडिओ आहे. यामध्ये रोहित शर्माच्या डान्सने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. रोहित शर्मा डान्स करतानाही १-२ दोन वेळा स्टेप विसरला आहे, दरम्यान त्याची पत्नी त्याला मदत करतानाही दिसत आहे.
रोहित शर्मा अलीकडेच कुटुंबासह सहलीला युरोपमध्ये गेला होता, तिथून तो भारतात परतला आहे. या सहलीदरम्यान रोहित शर्मा भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतील अखेरचा सामना पाहण्यासाठी ओव्हलच्या मैदानावर उपस्थित होता. यानंतर हिटमॅनने अलीकडेच नवी लॅम्बोर्गिनी उरूस घेतली आहे. याकारच्या नंबरप्लेटवरील क्रमांकाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.