Rohit Sharma’s Reaction on Retirement : भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात अप्रतिम कामगिरी केली होती. त्या स्पर्धेत सलग १० सामने जिंकल्यानंतर टीम इंडियाला अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते. यानंतर रोहित सुमारे दोन महिने क्रिकेटपासून दूर झाला होता. त्यामुळे प्रत्येकजण त्याच्या निवृत्तीचा अंदाज लावू लागला होता. मात्र, तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत संघात सामील झाला. आता इंग्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर बोलताना त्याने निवृत्तीबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले आहे.

आता त्याने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील सर्व सामने खेळले आणि संघाला ४-१ ने विजय मिळवून दिला. धरमशालामध्ये मालिका जिंकल्यानंतर आणि पाचव्या कसोटीत विजयाची नोंद केल्यानंतर रोहित शर्माने निवृत्तीच्या प्रश्नावर आपले मौन सोडले आहे. रोहित शर्माने मॅचनंतर जिओ सिनेमावर निवृत्तीबाबत वक्तव्य केले. त्यावेळी त्याच्यासोबत झहीर खानही उपस्थित होता. यादरम्यान रोहितने तो कधी निवृत्त होणार हेही सांगितले.

Will MS Dhoni play in T20 World Cup 2024
Team India : एमएस धोनी टीम इंडियात परतणार? टी-२० विश्वचषकाबाबत ‘या’ माजी खेळाडूंचा मोठा दावा
Rohit Sharma Shared Heart Wrenching Story of Daughter's Birth
लेकीच्या जन्मावेळी रोहित शर्मा पोहोचू शकला नाही, ‘हे’ दोन खेळाडू ठरले कारण; ५ वर्षांनी सांगितला मोठा प्रसंग
Rohit Sharma Talking about his retirement in the Breakfast with Champions show
रोहित शर्मा कधी म्हणणार क्रिकेटला अलविदा? हिटमॅनने निवृत्तीबाबत केलं मोठं वक्तव्य
Real Reason Behind MSD's Early Test Retirement
VIDEO : ‘जर तुला मूल हवे असेल तर …’, साक्षीने धोनीच्या कसोटी क्रिकेटमधून लवकर निवृत्तीचे खरे कारण सांगितले

रोहित शर्माने निवृत्तीबाबत दिली प्रतिक्रिया –

निवृत्ती घेण्याच्या प्रश्नावर उत्तर देताना रोहित शर्मा म्हणाला की, “जेव्हा एक दिवस मी झोपेतून जागा होईल आणि मला स्वतःला वाटेल की मी आता खेळण्यास योग्य नाही. त्याच दिवशी मी क्रिकेटमधून निवृत्ती घेईन. पण गेल्या दोन-तीन वर्षात मी माझ्या खेळात सुधारणा केली आहे, असे मला वाटते.” रोहित शर्माने गेल्या काही दिवसांत शानदार फलंदाजी केली आहे. त्याने कसोटी क्रिकेट, एकदिवसीय क्रिकेट आणि टी-२० क्रिकेटमध्येही शतके झळकावली आहेत. इंग्लंड कसोटी मालिकेतही रोहितने दोन शतके झळकावली.

हेही वाचा – IND vs ENG Test Series : भारत-इंग्लंडने रचला इतिहास, कसोटी क्रिकेटच्या १४७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘हे’ घडलं

रोहित शर्माची क्रिकेट कारकीर्द –

रोहित शर्माच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने आतापर्यंत ५९ कसोटी, २६२ वनडे आणि १५१ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत ४१३८ धावा आहेत, ज्यात १२ शतके आणि १७ अर्धशतकांचा समावेश आहे. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माने ३१ शतके आणि ५५ अर्धशतकांसह १०७०९ धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये रोहितने ५ शतके आणि २९ अर्धशतकांसह ३९७४ धावा केल्या आहेत. रोहित शर्मा २००७ पासून एकदिवसीय आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. त्याचबरोबर २०१३ मध्ये कसोटी पदार्पण केले होते.