भारतीय क्रिकेटच्या इतिहासात रविवारी रंगलेला सेमी फायनलचा सामना कायमच लक्षात राहिल. कारण या सामन्यात टीम इंडियाचा आघाडीचा खेळाडू विराट कोहलीने वन डे क्रिकेटमधल्या ५० व्या शतकाला गवसणी घातली. सचिन तेंडुलकरने आत्तापर्यंत वन डे क्रिकेटमध्ये ४९ शतकं केली आहेत. विराटने मागच्या सामन्यात शतक ठोकत या विक्रमाशी बरोबरी केली होती. त्यानंतर सचिनचा हा रेकॉर्डन विराटने न्यूझीलंडच्या विरोधातल्या सामन्यात तोडला आहे. सचिनने यानंतर विराटची पत्नी अनुष्का शर्माची स्टँडवर भेट घेतली. या दोघांचा फोटो व्हायरल झाला आहे.

काय दिसतं आहे फोटोत?

सचिन तेंडुलकर अनुष्काला भेटायला आला. अनुष्का या सामन्यात जिथे बसली होती त्या व्हिआयपी स्टँडवरुन ती विराटला चिअर करत होती. तसंच जेव्हा विराटचं शतक झालं तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहात होता. सचिन तेंडुलकर तिथे आला त्याने विराटचं ५० वं शतक झाल्याबद्दल तिचं अभिनंदन केलं. अनुष्काने हसत सचिन तेंडुलकरच्या शुभेच्छा स्वीकारल्या. हा फोटो कॅमेरात कैद झाला आहे आणि सोशल मीडियावर चांगलाच व्हायरलही झाला आहे.

ipl 2024 dhruv jurel salute his father ekana stadium wins heart sanju samson rr vs lsg
PHOTO : मुलगा धुव्र जुरेलची प्रत्यक्ष खेळी पाहून गर्वाने फुलली सैनिक वडिलांची छाती; मुलाचीही अर्धशतकाद्वारे वडिलांना सलामी!
Rohit Sharma Shared Heart Wrenching Story of Daughter's Birth
लेकीच्या जन्मावेळी रोहित शर्मा पोहोचू शकला नाही, ‘हे’ दोन खेळाडू ठरले कारण; ५ वर्षांनी सांगितला मोठा प्रसंग
Virat Kohli And Umpire Argument Video
KKR vs RCB : आऊट दिल्यानंतर विराट कोहली संतापला, अंपायरशी वाद घालतानाचा VIDEO व्हायरल
Suresh Raina Helps Limping ms dhoni Viral Video
IPL 2024: चालताना त्रास होणाऱ्या धोनीला सुरेश रैन्नाने दिला आधार, व्हीडिओ होतोय तुफान व्हायरल

सचिनने काय म्हटलं आहे विराटविषयी?

विराटने आपल्या एकदिवसीय कारकीर्दीतलं हे ५० वं शतक झळकावलं आहे. या शतकानंतर सचिन तेंडुलकरने विराटचं कौतुक केलं आहे. एका भारतीय खेळाडूने माझा विक्रम मोडीत काढणं, यापेक्षा मोठा आनंद असू शकत नाही, अशी प्रतिक्रिया सचिनने दिली. यावेळी त्यांनी तरुण विराट कोहलीच्या ड्रेसिंग रूममधल्या पहिल्या दिवसाची आठवण सांगितली आहे.

‘एक्स’ खात्यावर लिहिलेल्या पोस्टमध्ये सचिन तेंडुलकर विराटला उद्देशून म्हणाला, “जेव्हा मी तुला पहिल्यांदा भारतीय ड्रेसिंग रुममध्ये भेटलो, तेव्हा आपल्या संघातील इतर खेळाडूंनी तुझी फिरकी घेतली आणि माझ्या पायाला स्पर्श करायला लावलं. त्या दिवशी मला हसू आवरता आलं नाही. पण लवकरच, तू तुझ्या क्रिकेटच्या अप्रतिम कौशल्याने माझ्या हृदयाला स्पर्श केलास. तो तरुण मुलगा आज ‘विराट’ खेळाडू झाला आहे. याचा मला खूप आनंद आहे.”

“एका भारतीय खेळाडूने माझा विक्रम मोडला, यापेक्षा मोठा आनंद असू शकत नाही. हे शतक विश्वकपसारख्या मोठ्या स्पर्धेत, उपांत्य फेरी सामन्यात आणि माझ्या घरच्या मैदानावर झालं आहे, त्यामुळे हे माझ्यासाठी हा सोनेरी क्षण आहे,” या आशयाची प्रतिक्रिया सचिनने दिली आहे.