इंडोनेशिया सुपर सीरीज बॅडमिंटन स्पर्धेची गतविजेती भारताची फुलराणी सायना नेहवाल आपल्या पहिल्याच सामन्यात पराभवापासून बचावली. इंडोनेशियाच्या लिंडावेनी फानेत्री विरुद्धच्या सामन्यात सायनाचा अगदी थोडक्या फरकाने विजय झाला. पहिल्याच सामन्यात जागतिक क्रमवारीत १४ व्या स्थानावर असलेल्या फानेत्रीने क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या सायनाला अगदी कडवे आव्हान दिले होते. सामना अगदी अतितटीचा रंगला होता. जवळपास सव्वातास झालेल्या या सामन्याच्या अखेरीस सायनाने १७-२१, २९-२७, १३-२१ ने विजय मिळवला. सायनाचा यापुढील सामना जपानच्या सायाका तकाहाशी आणि थायलंडच्या पोर्नतिप पी यांच्यादरम्यान होणाऱ्या सामन्यातील विजयी खेळाडूशी होणार आहे.
सायना सामन्याच्या पहिल्या सेटमध्ये ५-२ने पुढे होती, परंतु फानेत्रीने उत्तम खेळीकरत पहिल्या सेटमध्ये गुणतालिका ९-९ झाली होती. त्यानंतर सायनाने काही आक्रमक फटके लगावले आणि दुसऱ्या सेटमध्ये ११-९ ने आघाडी घेतली होती.
संग्रहित लेख, दिनांक 11th Jun 2013 रोजी प्रकाशित
सायनाची निराशाजनक सुरूवात; पहिल्याच सामन्यात पराभवापासून बचावली!
इंडोनेशिया सुपर सीरीज बॅडमिंटन स्पर्धेची गतविजेती भारताची फुलराणी सायना नेहवाल आपल्या पहिल्याच सामन्यात पराभवापासून बचावली. इंडोनेशियाच्या लिंडावेनी फानेत्री विरुद्धच्या सामन्यात सायनाचा अगदी थोडक्या फरकाने विजय झाला.
First published on: 11-06-2013 at 03:55 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saina nehwal survives a scare in indonesia super series opener