श्रीकांत, कश्यपची घसरण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चीन सुपर सीरिज स्पर्धेत दुखापतीमुळे जेतेपदाने हुलकावणी दिलेली सायना नेहवाल जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत दुसऱ्या स्थानी स्थिर आहे. चीन तसेच हाँगकाँग सुपर सीरिज स्पर्धेत झटपट गाशा गुंडाळणाऱ्या किदम्बी श्रीकांत आणि पारुपल्ली कश्यपची यांची क्रमवारीत घसरण झाली आहे.
श्रीकांत १७व्या तर कश्यप १५व्या स्थानी आहे. एच.एस. प्रणॉयने दोन स्थानांनी सुधारणा करत १९वे स्थान गाठले आहे. अजय जयरामने एका स्थानाने सुधारणा करत २४वे स्थान पटकावले आहे.
दुखापतीतून सावरत पुनरागमन करणाऱ्या पी. व्ही. सिंधूने १२वे स्थान गाठले आहे. महिला दुहेरीत ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा जोडी १३व्या तर पुरुष दुहेरीत मनू अत्री-सुमीत रेड्डी जोडी २१व्या स्थानी आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saina settle in ranking
First published on: 20-11-2015 at 01:49 IST