भारताची सानिया मिर्झा हिने मार्टिना हिंगिस हिच्या साथीत रोम मास्टर्स टेनिस स्पर्धेत अंतिम फेरीत स्थान मिळविले. तसेच त्यांनी जागतिक क्रमवारीत दुहेरीत पुन्हा अव्वल स्थानावर झेप घेतली.  सानिया-हिंगिस जोडीने कॅरोलीन गार्सिया व कॅटरिना श्रेबोत्निक यांच्यावर ६-२, ७-६ (७-५) अशी मात केली. या जोडीला स्टुटगार्ट व माद्रिद येथील स्पर्धेतील पराभवानंतर जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थान गमवावे लागले होते. त्यांनी या मोसमात इंडियाना वेल्स, मियामी व चार्लस्टोन येथील स्पर्धामध्ये विजेतेपद मिळविले आहे. सानिया व हिंगिस यांना येथील अंतिम लढतीत तिमिया बाबोस व क्रिस्तिना मॅल्डेनोव्हिक यांच्याशी झुंजावे लागणार आहे. बाबोस व क्रिस्तिना यांनी उपांत्य फेरीत अ‍ॅला कुद्रीयत्सेवा व अनास्ताशिया पॅव्हेलेचेन्कोवा यांचा ६-२, ६-४ असा पराभव केला.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sania mirza martina hingis enter rome final reclaim number one spot
First published on: 17-05-2015 at 05:56 IST