ऑस्ट्रेलियन ओपन : सानिया-मार्टिनाला महिला दुहेरीचे विजेतेपद

चेक प्रजासत्ताकच्या अँड्रिया हॅलव्हाकोव्हा आणि लुसी हॅरडेका या जोडीचा पराभव केला.

Sania mirza,Martina hingis,सानिया आणि मार्टिना,सानिया मिर्झा, मार्टिना हिंगीस, sania mirza
सानिया आणि मार्टिनाने चेक प्रजासत्ताकच्या अँड्रिया हॅलव्हाकोव्हा आणि लुसी हॅरडेका या जोडीचा ७-६, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव केला.

भारताची सानिया मिर्झा आणि तिची जोडीदार मार्टिना हिंगिस या जोडीने सातत्यपूर्ण कामगिरीचा नजराणा पेश करत ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचे महिला दुहेरीचे विजेतेपद शुक्रवारी पटकावले.
सानिया आणि मार्टिनाने चेक प्रजासत्ताकच्या अँड्रिया हॅलव्हाकोव्हा आणि लुसी हॅरडेका या जोडीचा ७-६, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. चालू मोसमातील सानिया आणि मार्टिना जोडीचे हे पहिले ग्रॅंडस्लॅम आहे. सानिया-मार्टिना जोडीने जुलिया जॉर्जेस आणि कॅरलोलिना प्लिस्कोव्हा या जोडीचा ६-१, ६-० असा पराभव करीत ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. सानिया-मार्टिना या जोडीचा हा सलग ३६वा विजय ठरला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sania mirza martina hingis lift 3rd grand slam title