कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळणारा शुबमन गिल याच्याकडे भारतीय संघाचा भविष्यातील सलामीवीर म्हणून पाहिलं जातं. U-19 क्रिकेटमधील कामगिरीने शुभमनने सर्वच भारतीयांची मने जिंकली. त्यामुळे भविष्यातील स्टार खेळाडू म्हणून सध्या त्याची चर्चा आहे. यासोबत आणखी एका गोष्टीसाठीही शुबमनची जोरदार चर्चा आहे. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याची लेक सारा हिचं शुबमनशी अफेयर असल्याची चर्चा सध्या खूप गाजतेय. याचदरम्यान, सचिनने शुबमनबद्दल एक ट्विट केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शुबमन गिल आणि सारा हे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा बऱ्याच काळापासून सुरू आहे. त्यातच मुंबईविरूद्धच्या सामन्यात फारशी चमक दाखवू शकला नाही. पण या सामन्यातील क्षेत्ररक्षणात शुभमनने चांगली कामगिरी केली. त्या क्षणाचा व्हिडीओ सारा तेंडुलकरने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला होता. आणि त्यावर तीन हर्ट्सचे इमोजीदेखील वापरले होते. त्यामुळे या दोघांच्या अफेयरच्या चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर बुधवारी झालेल्या सामन्यात शुबमनने अतिशय उपयुक्त खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्यानंतर सचिनने त्याचं कौतुक करणारं एक ट्विट केलं. शुबमन गिलची अप्रतिम खेळी असं त्याने ट्विट केलं. त्यासोबत आंद्रे रसल, इयॉन मॉर्गन आणि कोलकाताच्या संपूर्ण संघाचंही त्याने कौतुक केलं.

दरम्यान, या घटनेआधीही शुबमन आणि सारा यांच्या अफेयरची चर्चा रंगली होती. दोघांनी एकाच वेळी “I SPY” असं कॅप्शन लिहून आपापले फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. तेव्हाही दोघांमध्ये काहीतरी शिजतंय की काय अशी चर्चा सोशल मीडियावर झाली होती. याशिवाय, शुबमन गिलने नव्या कोऱ्या कारसह स्वत:चा फोटो इनस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. त्यावेळीही साराने त्यावर खास कमेंट केली होती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sara tendulkar shubman gill dating love affair gossips sachin tendulkar mumbai tweet ipl 2020 vjb
First published on: 01-10-2020 at 16:00 IST