भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदाच्या कारभारापासून दूर ठेवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात बदल करण्यासाठी एन. श्रीनिवासन यांनी दाखल केलेली याचिका गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. न्यायमूर्ती बी. एस. चौहान आणि ए. के. सिकरी यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली आहे. ‘‘या प्रकरणात तुम्ही प्रतिवादी आहात. प्रत्येक सुनावणीच्या वेळी तुम्ही हजर होता. तुमच्या उपस्थितीतच सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. त्यामुळे त्यात बदल करता येणार नाहीत,’’ असे खंडपीठाने म्हटले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 23rd May 2014 रोजी प्रकाशित
श्रीनिवासन यांची याचिका फेटाळली
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदाच्या कारभारापासून दूर ठेवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात बदल करण्यासाठी एन. श्रीनिवासन यांनी दाखल केलेली याचिका गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
First published on: 23-05-2014 at 03:17 IST
TOPICSश्रीनिवासन
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sc rejects bcci chief srinivasans plea