टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धांची नुकतीच सांगता झाली. भारताने या ऑलिम्पिकमध्ये सर्वोत्तम प्रदर्शन केले. त्यामुळे संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण आहे. अशातच एक खेदजनक बातमी समोर आली आहे. एकीकडे आपण खेळाच्या विकासाबद्दल बोलत असताना, दुसरीकडे खेळाडूंच्या आर्थिक स्थितीचाही विचार होत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा खेळाडूंकडून आपण एवढ्या मोठ्या व्यासपीठावर पदके जिंकण्याची अपेक्षा कशी करू शकतो?

वृत्तसंस्था एएनआयने बॉक्सर रितूचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे सर्व फोटो चंदीगडचे आहेत. या फोटोंमध्ये बॉक्सर रितू पार्किंग स्लिप फाडत आहे. आर्थिक परिस्थितीच तिचे मनोधैर्य खूप खचले आहे. रितूच्या म्हणण्यानुसार, तिला तिच्या घराचा खर्च भागवण्यासाठी पार्किंग अटेंडटचे काम करावे लागते. तिचे वडील आजारी आहेत, त्यामुळे तिला घर चालवण्यासाठी बॉक्सिंग सोडावे लागले. जरी रितूला तिचा खेळ सोडावा लागला.

 

 

बॉक्सिंग सोडण्याशिवाय पर्याय नव्हता”

रितूची चांगली प्रगती होत होती, पण नंतर तिचे वडील आजारी पडले आणि म्हणून कौटुंबिक उत्पन्नात योगदान देण्यासाठी तिला खेळ सोडावा लागला. रितूने एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले, “मी दहावीत असताना बॉक्सिंगमध्ये रस घेतला. त्यानंतर मी राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. मी राष्ट्रीय स्तरावर व्हॉलीबॉल आणि कुस्ती खेळले आहे. मग माझे वडील आजारी पडले आणि ते पुन्हा काम करू शकले नाहीत. त्यामुळे मला कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी काम करावे लागले. मी माझ्या क्रीडा शिक्षकाची मदत मागितली होती. मला माझा अभ्यासही सोडावा लागला. मला क्रीडा कोट्यातून ना शिष्यवृत्ती मिळाली ना नोकरी. माझ्याकडे बॉक्सिंग सोडण्याशिवाय पर्याय नव्हता.”

हेही वाचा – ‘नीरज’ नावाच्या व्यक्तींसाठी अत्यंत महत्वाची बातमी; मिळणार मोफत पेट्रोल..! जाणून घ्या ऑफरबद्दल

दिवसाला मिळतात ३५० रुपये

रितूने राष्ट्रीय स्तरावर अनेक सामने खेळले आहेत. त्यात तिने अनेक पदके देखील जिंकली आहेत, परंतु कोणत्याही सरकारी संस्थेने तिला पाठिंबा दिला नाही. तसेच तिला कोणत्याही संस्थेकडून शिष्यवृत्ती मिळाली नाही. २०१७मध्ये तिने या खेळापासून फारकत घेतली. ती आता पार्किंग अटेंडंट म्हणून काम करत आहे आणि दिवसाला ३५० रुपये कमावते.

रितूची परिस्थिती समोर आल्यानंतर सोशल मीडियावर अनेक लोक तिच्या समर्थनार्थ पुढे आले.