अमेरिकेची आघाडीची टेनिसपटू सेरेना विल्यम्सने US Open स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. सेरेनाने लॅटिव्हीयाच्या अनास्तासिजा सेवास्तोवाचा ६-३, ६-० ने पराभव केला. अंतिम फेरीत विजय मिळवल्यास सेरेना सर्वाधिक २४ ग्रँडस्लॅम विजेतेपदं मिळवण्याच्या विक्रमाशी बरोबरी करेल. संपूर्ण सामन्यात सेरेनाने आपलं वर्चस्व गाजवलं, अवघ्या ६६ मिनीटांमध्ये सेरेनाने आपली प्रतिस्पर्धी अनास्तासिजाचा पराभव केला.

अवश्य वाचा – US Open 2018 : जोकोव्हिच, कीजची उपांत्य फेरीत धडक

वर्षभरापूर्वी आपल्या मुलीला जन्म दिल्यानंतर सेरेनाने मोठ्या दणक्यात टेनिसकोर्टवर पुनरागमन केलं आहे. दुसरीकडे जागतिक क्रमवारीत १९ व्या क्रमांकावर असलेल्या सेवास्तोवाने मात्र भ्रमनिरास केला. साखळी फेरीमध्ये तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांना हरवून उपांत्य फेरी गाठलेली सेवास्तोवा सेरेनाला चांगली टक्कर देईल अशी आशा होती. मात्र सेरेनाच्या खेळापुढे तिचा निभाव लागला नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.