एकाच डावात हजार धावांची कल्पनातीत खेळी साकारणाऱ्या प्रणव धनावडेला मुंबई क्रिकेट संघटनेकडून (एमसीए) १० हजारांची मासिक शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. एमसीएचे संघटनेचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी ही घोषणा केली. प्रणवने मंगळवारी भंडारी चषक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत (१६ वर्षांखालील) के. सी. गांधी संघाकडून खेळताना नाबाद १००९ धावांची खेळी साकारली होती. या खेळीत १२९ चौकार आणि ५९ षटकारांचा समावेश होता. प्रणवच्या या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतूक होत आहे. सचिन तेंडुलकर, अजिंक्य रहाणे आणि महेंद्रसिंग धोनी यांनी प्रणवच्या कामगिरीचे कौतूक करत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या. याशिवाय, प्रणवच्या या कामगिराचा राज्य सरकारच्या वतीने सन्मान करण्यासाठी क्रीडा विभागाच्या वतीने प्रणवच्या क्रिकेट प्रशिक्षणाकरिता त्याला आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी दिले होते.