Shoaib Malik breaks silence on match fixing allegations : पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकने लीग बीपीएलमधील मॅच फिक्सिंगचे आरोप आणि फॉर्च्यून बरीशाल संघासोबतचा करार संपुष्टात आणल्याचा दावा साफ फेटाळून लावला. सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवांनुसार, मॅच फिक्सिंगच्या संशयामुळे फ्रँचायझीने मलिकचा करार रद्द केला आहे. २२ जानेवारीला खुलना टायगर्सविरुद्धच्या सामन्यात सुरुवातीच्या षटकात तीन नो बॉल टाकल्यानंतर अशा प्रकारच्या अटकळांना सुरुवात झाली. या आरोपांना न जुमानता, मलिकने फ्रँचायझीसाठी आणखी एक सामना खेळला ज्यानंतर बीपीएल २०२४ चा ढाका टप्पा संपला.

फिक्सिंगच्या आरोपांवर शोएब मलिकने सोडले मौन –

शोएब मलिकने त्याच्या ‘एक्स’ अकाऊंटवर लिहिले की, ‘ज्यावेळी अफवा येतात, विशेषत: अलीकडे ज्या अफवा पसरत आहेत, तेव्हा मला सावध राहण्याच्या महत्त्वावर जोर द्यायचा आहे. मला हे स्पष्ट करायचे आहे की मी या निराधार अफवांचे खंडन करतो. प्रत्येकाने कोणत्याही माहितीवर विश्वास ठेवणे आणि ती पसरवण्यापूर्वी तपासणे फार महत्वाचे आहे. खोटेपणामुळे प्रतिष्ठा खराब होऊ शकते आणि अनावश्यक गोंधळ निर्माण होऊ शकतो. सत्याला प्राधान्य द्या आणि वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी केवळ विश्वसनीय स्त्रोतांवर अवलंबून रहा. तुम्ही समजून घेतल्याबद्दल धन्यवाद.

Former Zimbabwean cricketer Guy Whittle
Guy Whittall : धक्कादायक! माजी क्रिकेटरवर बिबट्याचा जीवघेणा हल्ला, कुत्र्याने वाचवला जीव, रक्ताने माखलेला फोटो व्हायरल
MS Dhoni Review System as Umpire Gives Wide Ball in CSK vs LSG match IPL 2024
IPL 2024: धोनी रिव्ह्यू सिस्टीम! पंचांचा निर्णय अन् लगेचच माहीचा रिव्ह्यूसाठी इशारा, पाहा काय घडलं?
Brad Hogg Says Parag Is eggo
IPL 2024 : ‘त्याच्यामध्ये अजूनही अहंकार आहे…’, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचे रियान परागबद्दल मोठं वक्तव्य
IPL, GT vs PBKS Preity Zinta Post For Shashank Singh
“IPL लिलावाच्या वेळी झालेल्या चुकीच्या..”, शशांक सिंगबाबत वादावर प्रीती झिंटाने सोडलं मौन, म्हणाली, “आजचाच..”

शोएबने सोशल मीडियावर दिली प्रतिक्रिया –

शोएब मलिकने संघाचा कर्णधार तमीम इक्बालशी झालेल्या चर्चेचे स्पष्टीकरण देखील दिले आणि सांगितले की त्यांनी एकत्रितपणे दुबईतील एका मीडिया कार्यक्रमासाठी बांगलादेशमधून तात्पुरते प्रस्थान करण्याची योजना आखली. शोएब मलिक म्हणाला, ‘आधीच्या प्लॅननुसार मला दुबईत एका मीडिया इव्हेंटसाठी बांगलादेशहून निघावे लागले. आगामी सामन्यांसाठी मी फ्रँचायझीला शुभेच्छा देतो आणि गरज पडल्यास मी त्यांना पाठिंबा देण्यासाठी उपलब्ध आहे. शोएब मलिकने फ्रँचायझी मालक मिझानुर रहमानने मॅच फिक्सिंगच्या बातम्या फेटाळल्याचा व्हिडीओही पोस्ट केला आहे.

हेही वाचा – Ranji Trophy 2024 : दिल्लीवर भेदभाव केल्याचा आरोप, क्षितिजसाठी बदोनीला वगळले, धडा शिकवण्यासाठी कापली मॅच फी

शोएब मलिकची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द –

३५ कसोटी सामने – १९९८ धावा, ३२ बळी
२८७ एकदिवसीय सामने – ७५३४ धावा, १५८ बळी
१२४ टी-२० सामने – २४३५ धावा, २८ बळी