ऑलिम्पिक रौप्यपदकविजेता नेमबाज विजयकुमार याला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यातील खेळाडूंच्या संचलनात भारताचा ध्वज नेण्याचा मान मिळाला आहे. तो जर ऐन वेळी उपलब्ध झाला नाही तर योगेश्वर दत्त याला ही संधी दिली जाईल, भारतीय पथकाचे प्रमुख राजसिंग यांनी ही माहिती दिली. केंद्रीय क्रीडा सचिव अजित शरण, भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे अध्यक्ष एन. रामचंद्रन व सरचिटणीस राजीव मेहता यांनी येथील क्रीडाग्रामला भेट देत भारतीय खेळाडूंबरोबर चर्चा केली.