मुंबई खो खो संघटनेच्या मान्यतेने व सुवर्ण क्रीडा मंडळ, सायन कोळीवाडा आयोजित मुंबई जिल्हा पुरुष/महिला निमंत्रित खो-खो स्पध्रेत दादरच्या श्री समर्थ व्यायाम मंदिरने दुहेरी मुकुट पटकावले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महिलांच्या अंतिम फेरीच्या सामन्यात श्री समर्थ व्यायाम मंदिरने अटीतटीच्या झुंजीत शिवनेरी सेवा मंडळाचा ९-८ असा पराभव केला. श्री समर्थने मध्यंतराला घेतलेल्या २ गुणांच्या आघाडीमुळेच शिवनेरीवर सरशी मिळवता आली. श्री समर्थचे अनुष्का प्रभू, साजल पाटील तसेच शिवनेरीची दर्शना सकपाळ यांनी तगडे संरक्षण केले, तर आक्रमणात श्री समर्थच्या साजल पाटील व शिवनेरीच्या शुभांगी जाधव यांनी सुंदर खेळ केला.

पुरुषांच्या अंतिम फेरीच्या सामन्यात श्री समर्थ व्यायाम मंदिरने ओम समर्थ भारत व्यायाम मंदिरवर १७-१२ असा  मिळवला. श्री समर्थ तर्फे विराज कोठमकर, तेजस शिरसकर, वेदांत देसाई व सिद्विक भगत यांनी दमदार खेळ केला. ओम समर्थकडून  प्रयाग कनगुटकर, अभिषेक काटकर व तन्मय पवार यांनी कडवी झुंज दिली.

सवरेत्कृष्ट खेळाडू

महिला व पुरुष संघाचे जेतेपद पटकावणारा श्री समर्थ व्यायाम मंदिरचा संघ.

संरक्षक : दर्शना सकपाळ (शिवनेरी), प्रयाग कनगुटकर  (ओम समर्थ )

आक्रमक : अनुष्का प्रभू ( श्री समर्थ), तेजस शिरसकर (श्री समर्थ )

अष्टपलू : साजल पाटील ( श्री समर्थ), विराज कोठमकर (श्री समर्थ )

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shree samarth win in kho kho competition
First published on: 15-05-2016 at 02:16 IST