देवेंद्र पांडे, इंडियन एक्सप्रेस

Asia Cup Squad Update: आशिया चषक २०२५ साठी भारताचा संघ १९ ऑगस्टला होण्याची शक्यता आहे. पण भारतीय संघात कोणाला संधी देणार आणि एकाच जागेसाठी २-३ खेळाडू दावेदार आहेत. १९ तारखेला भारताच्या निवड समितीची बैठक होणार आहे, या बैठकीत कोणत्या खेळाडूंवर मोहोर लागणार, हे पाहणं उत्सुकतेचं असेल. पण एक रिपोर्ट समोर आला आहे, ज्यामध्ये शुबमन गिलला संघात स्थान देणार नसल्याची अपडेट समोर आली आहे.

भारताचा कसोटी कर्णधार शुबमन गिलला आशिया कप २०२५ टी-२० संघात स्थान मिळणं कठीण असणार आहे, निवडकर्त्यांना १५ जणांच्या संघात गिलला स्थान मिळवून देण्यासाठी फार विचार करावा लागत आहे. भारतीय संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांचे मत आहे की, गिल सध्या त्यांच्या टी-२० योजनेत बसत नाही. याचा अर्थ असा आहे की गिल दुबईला जाणारे विमान प्रवास करणार नाही, कारण आशिया चषक संघाचा भाग नसेल. भारतीय संघ व्यवस्थापन २०२४ च्या टी-२० विश्वचषकानंतर ज्या खेळाडूंचा संघात समावेश केला आहे, त्याच खेळाडूंना कायम ठेवू इच्छित आहे.

शुबमन गिलला आशिया चषकासाठी संधी मिळणं अवघड

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, निवडकर्ते १९ ऑगस्टला होणाऱ्या निवड समितीच्या बैठकीपूर्वी भारतीय बोर्ड अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देणार आहे. भारतीय संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादवकडेच राहील, सूर्या फिट असल्याचा हिरवा कंदीलदेखील मिळाला आहे.

निवडीपूर्वी झालेल्या अनौपचारिक चर्चेत गिलचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्याबाबत चर्चा झाली. शुबमन गिलचा जर संघात समावेश केला तर त्याला सलामीला उतरण्याची संधी द्यावी लागेल. पण अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनने सलामीवीर म्हणून आपली जबाबदारी चोख पार पाडली आहे. त्यामुळे संघाला आपल्या जुन्या सलामीवीरांबरोबर आशिया चषकात उतरायचं आहे.

तिलक वर्माल वगळून शुबमन गिलला संधी द्यावी का अशीदेखील अनौपचारिक चर्चा झाली होती. पण आयसीसी टी-२० क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या डावखुऱ्या फलंदाजाला वगळणं हे चुकीचं ठरेल, असं संघ व्यवस्थापनाचं मत आहे. गिलचा संघात समावेश करून तो न खेळता बेंचवर बसेल असं चित्रदेखील संघाला नको आहे.

इंग्लंडमध्ये अलिकडेच मिळालेल्या यशाचा अर्थ असा की, जिथे स्टार खेळाडूंशिवाय तरुण भारतीय क्रिकेट संघाने २-२ अशी बरोबरी साधली होती, परंतु दोन वेगवेगळ्या स्वरूपातील संघांमुळे त्याचा आगामी निवडीवर फारसा परिणाम होणार नाही.

“जर गिलला संघात स्थान मिळालं तर तो सलामीसाठी संधी द्यावं लागेल आणि जर निवडीनंतर त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं नाही तर त्याला संघात घेण्याचा काहीच अर्थ नाही. याशिवाय संजूवर अन्याय होईल, ज्याने गेल्या सामन्यांमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली होती. जर गिलला संघात स्थान मिळालं तर संजूला ड्रॉप करावं लागेल आणि जितेशला संधी मिळेल,” असे बीसीसीआयमधील एका सूत्राने सांगितले.

भारतीय संघ व्यवस्थापन आणि निवड समिती तिसरा सलामीवीर म्हणून मुंबईच्या यशस्वी जैस्वालचा विचार करत आहे. जैस्वाल २०२४ च्या विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होता पण त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. जैस्वालला वगळून गिलला निवडायचं की नाही याबद्दल अनौपचारिक चर्चा झाली होती परंतु या विषयावर निर्णय़ घेण्यात आला नाही.