IND v NZ, World Cup semi-final Highlights: बुधवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील विश्वचषक २०२३ च्या उपांत्य फेरीसाठी वापरल्या गेलेल्या वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीवर प्रचंड टीका झाली होती, भारताने स्वतःच्या फायद्यासाठी नियमांना पायदळी तुडवल्याची टीकाही अनेकांनी केली होती. मात्र मूळ सामन्यात भारत व न्यूझीलंड दोन्ही संघांचा खेळ पाहता खेळपट्टीवरील टीका ही चुकीचीच सिद्ध झाली आहे. याच टीकाकारांना फटकारताना भारतीय क्रिकेटमधील दिग्गज सुनील गावसकर यांनी खडेबोल सुनावले आहेत.

भारताने उपांत्य फेरीत ३९७ धावा करून न्यूझीलंडला तगडे आव्हान दिले होते पण आक्रमक न्यूझीलंड संघाने सुद्धा काही क्षणी भारताची चिंता वाढवली होती. अखेरीस ७० धावांनी विजय आपल्या नावे करत भारताने अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. सामन्यानंतर प्रसारकांशी बोलताना सुनील गावसकर म्हणाले की, पहिल्या उपांत्य फेरीत वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीवर ७२४ धावा केल्या गेल्या होत्या, त्यामुळे आता तरी या मूर्ख टीकाकारांनी तोंड बंदच करायला हवं.

Rajat Patidar's 4 Consecutive Sixes Video Viral
६,६,६,६…पाटीदारने मयंकच्या षटकात धावांचा पाऊस पाडत रचला इतिहास, आरसीबीसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू
Suresh Raina interview on lantop,
IPL 2024 : ‘ज्या संघांनी पार्ट्या केल्या त्यांनी अजून आयपीएल जिंकली नाही’, सुरेश रैनाने नाव घेता ‘या’ संघांना डिवचले
Shubman Gill Angry At Third Umpire's Decision
RR vs GT : तिसऱ्या पंचांच्या ‘त्या’ निर्णयानंतर शुबमन गिल मैदानावरील पंचांवर संतापला, VIDEO होतोय व्हायरल
Hyderabad beat Punjab by 2 runs
SRH vs PBKS : हैदराबादविरुद्धच्या पराभवासाठी शिखर धवनने कोणाला जबाबदार धरले? ‘या’ दोन खेळाडूंची वारंवार घेतली नावे

वानखेडेच्या खेळपट्टीचा वाद काय होता?

एका ब्रिटीश वृत्तपत्राने असा दावा केला आहे की आयसीसी खेळपट्टी सल्लागार अँडी ऍटकिन्सन, जे विश्वचषकाच्या खेळपट्ट्यांच्या तयारीवर देखरेख करण्यासाठी स्थानिक क्युरेटर्ससोबत काम करत आहेत, ते खेळपट्टीच्या बदलामुळे खूश नव्हते आणि ते सामन्याच्या खेळपट्टीच्या तयारीची देखरेख करण्यासाठी अहमदाबादला रवाना झाले होते.

भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात अ‍ॅटकिन्सनला खेळपट्टीतील बदलाबाबत स्पष्टपणे माहिती देण्यात आली नसल्याचा दावाही अहवालात करण्यात आला आहे, तर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या अनेक माजी क्रिकेटपटूंनी निदान उपांत्य फेरीत (नॉकआउट सामन्यात) नवीन खेळपट्टीचा वापर केला पाहिजे अशी मागणी केली होती. वानखेडे येथे कालचा सामना हा खेळपट्टी क्रमांक सहा वर पार पडला जिथे विश्वचषकात अगोदरच दोन सामने झाले होते. तर खेळपट्टी क्रमांक ७ नवीन असूनही वापरण्यात आली नव्हती.

सुनील गावसकर काय म्हणाले?

गावसकर यांनी टीकाकारांना उत्तर देत म्हटले की, “लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी विचार न करता भारताबद्दल बोलणे थांबवा. हा मूर्खपणा आहे. जरी पीच बदलले असले तरी ते दोन्ही संघांना नाणेफेकपूर्वी हे माहित होतेच, भारताची फलंदाजी संपल्यावर हा निर्णय झाला नव्हता. नाणेफेक झाल्यावर काही बदललं नाही. जो संघ चांगला खेळला तो जिंकला. आणि अजून दुसरी उपांत्य फेरी सुद्धा झालेली नाही तरी आधीच तुमची फायनल्सच्या पीचवर बोलताय, हे थांबवा”

आयसीसीने आरोपांवर काय स्पष्टीकरण दिले?

आयसीसीने एका निवेदनात इंग्लिश मीडियाच्या विचित्र दाव्यांना प्रतिसाद दिला आणि खेळपट्टीतील बदलाबाबत खेळपट्टी सल्लागाराला माहिती देण्यात आली होती याची पुष्टी केली. आयसीसी प्रवक्त्याने सांगितले की, “मोठ्या कालावधीसाठी चालू असलेल्या स्पर्धेच्या दरम्यान काही वेळा नियोजित खेळपट्टीच्याबाबत करावे लागणारे बदल सामान्य आहेत आणि यापूर्वीही दोन वेळा झाले आहेत. हा बदल यजमान व क्युरेटरच्या शिफारसीनुसार करण्यात आला आहे. आयसीसीच्या स्वतंत्र खेळपट्टी सल्लागाराला या बदलाची माहिती देण्यात आली होती आणि खेळपट्टी चांगली खेळणार नाही यावर विश्वास ठेवण्याचे कोणतेही कारण नाही. “

हे ही वाचा<< “राहुल गांधी एकटे शमीच्या पाठीशी, तुम्ही हिंदू- मुस्लिम..”, ‘त्या’ प्रसंगी शमीला ट्रोल केल्याने काँग्रेस नेत्याने ओढले ताशेरे

दरम्यान, भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यातआपला दहावा विजय नोंदवत भारत आता विश्वचषकाच्या अंतिम फेरीत रविवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्याशी लढणार आहे.