सिंधु उपांत्य फेरीत, साईनाचा पराभव

स्विस ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या पी. व्ही. सिंधूने तिस-या मानांकित शिझियान वँगचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

स्विस ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या पी. व्ही. सिंधूने तिस-या मानांकित शिझियान वँगचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. मात्र, भारताची स्टार बॅडमिंटनपटू साईना नेहवालला उपांत्यपूर्व फेरीतच पराभवाला सामोरे जावे लागले आहे. सिंधूने शिझियानचा 45 मिनिटांतच 21-17, 21-15 असा सरळ दोन गेममध्ये पराभव केला. तर, साईनाला यिहान वँगने 21-17, 21-12 असे पराभूत केले. दुसरीकडे पुरूष गटात भारताच्या पुरूपल्ली कश्यपने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. कश्यपने तैपेईच्या तेन चेन चोऊ याचा एक तास 14 मिनिटे चाललेल्या सामन्यात 15-21, 23-21, 21-18 असा पराभव केला. या स्पर्धेचे साईनाने दोनवेळा विजेतेपद मिळविलेले आहे. आता साईनाचे आव्हान संपुष्टात आल्याने भारतीयांची आशा सिंधूच्या कामगिरीवर आहे. सिंधूचा उपांत्य फेरीत सामना चीनच्या सून यू हिच्याशी होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sindhu enter in semi finals of swiss open badminton