scorecardresearch

Premium

WI vs ENG : सॅम करनने वेस्ट इंडिजविरुद्ध फलंदाजी करताना केलं अस काही की, सोशल मीडियावर होतोय ट्रोल; पाहा VIDEO

Sam Curran Video Viral : वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात सॅम करन सर्वात जास्त देणारा गोलंदाज ठरला. यापूर्वी फलंदाजी करताना सनग्लासेस लावल्यामुळे सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.

Sam Curran Troll on Social Media
सॅम करन सोशल मीडियावर ट्रोल (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Sam Curran Troll on Social Media : इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना अतिशय रोमांचक झाला. एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये अत्यंत खराब कामगिरी केल्यानंतर, इंग्लंड संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे आणि दोन्ही संघांमधील पहिला एकदिवसीय सामना 3 डिसेंबर रोजी खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ३२५ धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात वेस्ट इंडिज संघाने शाई होपच्या नाबाद शतकाच्या जोरावर ४८.५ षटकांत ६ गडी गमावून विजय मिळवला. आता या सामन्यातील सॅम करनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या सामन्यात इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करन सनग्लासेस लावून फलंदाजी करताना दिसला. त्यामुळे त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मैदानावरील कामगिरीपेक्षा करन सनग्लासेस लावल्यामुळे चर्चेत आहे. त्यामुळे त्याची सोशल मीडियावर खिल्लीही उडवली जात आहे. करन सनग्लासेस लावल्याने चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. आयपीएलच्या एका सामन्यादरम्यानही त्याने वेगळ्या प्रकारचा चष्मा घातला होता. त्यानंतरही त्याचा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

AUS vs NZ 2nd T20I Highlights in marathi
AUS vs NZ : मॅक्सवेलने फिंचचा विक्रम मोडत रचला इतिहास, ऑस्ट्रेलियासाठी ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज
England vs India match preview,
मायदेशातील वर्चस्व राखण्याची संधी! फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर भारत इंग्लंड चौथी कसोटी आजपासून
india vs england 3rd test playing xi sarfaraz jurel set for debut
अननुभवी मधल्या फळीची कसोटी! भारत इंग्लंड तिसरा सामना आजपासून; सर्फराज, जुरेलच्या पदार्पणाची शक्यता
India won by 106 Run against England IND vs ENG 2nd Test
IND vs ENG : भारताने दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा १०६ धावांनी उडवला धुव्वा, मालिकेत १-१ ने साधली बरोबरी

सॅम करन एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा देणारा इंग्लिश गोलंदाज ठरला –

वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी ३२६ धावांचे लक्ष्य होते, ज्याचा इंग्लिश गोलंदाज बचाव करू शकले नाहीत. या सामन्यात अष्टपैलू खेळाडू सॅम करन खूपच महागडा ठरला. त्याने या सामन्यात ९.५ षटके गोलंदाजी केली. ज्यात त्याने १०.०० च्या इकॉनॉमी रेटने ९८ धावा दिल्या. या स्पेलनंतर सॅम करन आता इंग्लंडसाठी वनडे सामन्यात सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज ठरला आहे. याआधी हा वाईट विक्रम स्टीव्ह हार्मिसनच्या नावावर नोंदवला होता, ज्याने २००६ मध्ये आपल्या स्पेलमध्ये ९७ धावा दिल्या होत्या, तर ख्रिस जॉर्डनने २०१७ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या स्पेलमध्ये ९७ धावा दिल्या होत्या. आता या यादीत सॅम करन पहिल्या क्रमांकावर आला आहे.

हेही वाचा – IND vs AUS: सूर्याने सुरू ठेवली धोनीची ‘ही’ परंपरा, बीसीसीआयने शेअर केला टीम इंडियाचा VIDEO

एकदिवसीय सामन्यात इंग्लंडच्या गोलंदाजाने दिलेल्या सर्वाधिक धावा –

९८ धावा – सॅम करन विरुद्ध वेस्ट इंडिज (२०२३)
९७ धावा – स्टीव्ह हार्मिसन विरुद्ध श्रीलंका (२००६)
९७ धावा – ख्रिस जॉर्डन विरुद्ध न्यूझीलंड (२०१७)

हेही वाचा – Jasprit Bumrah : नीरज चोप्राने बुमराहला दिला महत्त्वाचा सल्ला; म्हणाला, ‘वेग वाढवण्यासाठी त्याला फक्त…’

या सामन्यात इंग्लंडची फलंदाजी चांगली होती, जरी या संघासाठी हॅरी ब्रूकने ७१ धावांची सर्वोत्तम खेळी केली. जॅक क्रॉलीने ४८ धावा केल्या, तर फिल सॉल्टने ४५ धावांची जलद खेळी केली. वेस्ट इंडिजसाठी अॅलेक अथानाजेने ६६ धावांची खेळी खेळली, तर संघाचा कर्णधार शाई होपने इंग्लंडच्या आशा धुळीस मिळवल्या आणि संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात त्याने ८३ चेंडूत ७ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने १०९ धावांची नाबाद खेळी साकारली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Social media trolls sam curran for wearing sunglasses while batting wi vs eng 1st odi match updates vbm

First published on: 04-12-2023 at 16:44 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×