Neeraj Chopra has advised Jasprit Bumrah to his pace : सध्याचा ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राने त्याचा आवडता वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला अधिक वेग कसा वाढवता येईल याचा सल्ला दिला आहे. एकदिवसीय विश्वचषक फायनल पाहण्यासाठी नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर उपस्थित होता. नीरजने बुमराहला त्याचा आवडता वेगवान गोलंदाज म्हणून वर्णन केले आहे. त्याच्या गोलंदाजीच्या शैलीचे कौतुक केले आहे. विशेश म्हणजे चेक प्रजासत्ताकचा विश्वविक्रम धारक जॉन झेलेझनी आणि नॉर्वेचा आंद्रियास थॉर्किलडसेन यांच्यानंतर ऑलिम्पिक आणि जागतिक विजेतेपद दोन्ही जिंकणारा नीरज चोप्रा इतिहासातील फक्त तिसरा भालाफेकपटू आहे.

जसप्रीत बुमराहने विश्वचषकात चमकदार कामगिरी करत २० विकेट घेतल्या होत्या. तथापि, चोप्राला वाटते की एक छोटासा बदल त्याचा आवडता वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा वेग वाढवण्यास मदत करेल. तो इंडियन एक्सप्रेसच्या आयडिया एक्सचेंज या कार्यक्रमात म्हणाला, “जसप्रीत बुमराहची गोलंदाजी करण्याची शैली आवडते. मला वाटतं त्याचा वेग आणखी वाढवण्यासाठी त्याने रनअप वाढवले पाहिजे. भालाफेकपटू या नात्याने आम्ही अनेकदा चर्चा करतो की, गोलंदाजाने थोडेसे मागून रन-अप सुरू केल्यास त्याचा वेग वाढेल.”

With 200 runs per day in IPL is it time to rethink the pitch impact player rule
‘आयपीएल’मध्ये दररोज २०० धावांच्या राशी! खेळपट्ट्या, इम्पॅक्ट प्लेयर नियमाचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे का?
Loksatta explained Is Apple ReALM better than ChatGPT
ॲपलचे ReALM चॅटजीपीटीपेक्षा सरस? येत्या जूनपासून ‘एआय’ क्षेत्रात धुमाकूळ?
RBI repo rate announcement Shaktikanta Das
आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे ठेवण्याचे कारण काय? जाणून घ्या
risk of H5N1 bird flu outbreak Case Was Seen in Hens At Nagpur
कोविडहुन १०० पट जास्त भीषण विषाणू उड्या मारतोय! नागपुरातही आढळलं प्रकरण, तज्ज्ञांचं मत काय?

जसप्रीत बुमराह ताशी १४० किमीपेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करू शकतो –

जसप्रीत बुमराहची गणना जगातील महान वेगवान गोलंदाजांमध्ये केली जाते. त्याच्याकडे ताशी १४० किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. त्याची ॲक्शन अगदी वेगळी आहे. वेग निर्माण करण्यासाठी तो त्याच्या कंबरेवर खूप जोर देतो. त्याची ही ॲक्शन धोकादायक आहेच, पण त्यामुळे त्याला दुखापत होण्याचाही धोका आहे. पाठीच्या दुखापतीमुळे तो जवळपास वर्षभर मैदानापासून दूर राहीला होता.

हेही वाचा – IND vs AUS: सूर्याने सुरू ठेवली धोनीची ‘ही’ परंपरा, बीसीसीआयने शेअर केला टीम इंडियाचा VIDEO

बुमराह दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर फक्त कसोटी मालिका खेळणार –

त्याने ऑगस्टमध्ये आयर्लंड मालिकेदरम्यान पुनरागमन केले आणि तो त्याच्या जुन्या रंगात परतला. दुखापतीनंतरही त्याने आपल्या ॲक्शनमध्ये बदल केला नाही. त्याचा वेगही कमी झाला नाही. पुनरागमनानंतर तो अधिक धारदार दिसत आहे. २०२३ च्या विश्वचषकातील त्याची कामगिरी हे त्याचे उदाहरण आहे. बुमराहची दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. एकदिवसीय आणि टी-२० मालिकेत तो संघाचा भाग असणार नाही.

हेही वाचा – IPL 2024 : सीएसके संघात अंबाती रायुडूची जागा कोण घेणार? अश्विनने सुचवले त्रिशतक झळकावणाऱ्या ‘या’ खेळाडूचे नाव

वर्ल्डकपचा ​​अनुभवही शेअर केला –

विश्वचषक फायनलमध्ये उपस्थित राहण्याचा एक चाहता म्हणून त्याच्या अनुभवाबद्दल नीरज चोप्रा म्हणाला, “मी पहिल्यांदाच पूर्ण सामना पाहिला. भारताने जेव्हा तीन विकेट गमावल्या होत्या, तेव्हा मी आलो होतो. त्यावेळी विराट भाई आणि केएल राहुल फलंदाजी करत होते. काही तांत्रिक गोष्टी असू शकतात ज्या मला समजत नाहीत. दिवसा फलंदाजी करणे सोपे नव्हते. त्या दिवशी संध्याकाळी फलंदाजी करणे सोपे झाले, असे मला वाटते. पण आपल्या संघाच्या खेळाडूंनी पूर्ण प्रयत्न केले. कधीकधी, तो आपला दिवस नसतो. पण, खरे सांगायचे, तर स्पर्धा खूप छान होती.”