आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये एकेरी प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सोमदेव देववर्मनने एटीपी ५०० सिटी खुल्या टेनिस स्पर्धेत युक्रेनच्या अलेक्झांडर डोग्लोपोव्हवर सनसनाटी विजय मिळवला. सोमदेवने डोग्लोपोव्हचा ६-३, ७-६ (७-४) असा धुव्वा उडवत उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान पटकावले.
प्रभावी बिनतोड सव्‍‌र्हिस करत जागतिक क्रमवारीत १२९व्या स्थानी असलेल्या सोमदेवने क्रमवारीत २५व्या स्थानी असलेल्या डोग्लोपोव्हचे आव्हान संपुष्टात आणले. डोग्लोपोव्हच्या पाचच्या तुलनेत सोमदेवने नऊ बिनतोड सव्‍‌र्हिस लगावत जबरदस्त वर्चस्व गाजवले. पहिल्या आणि दुसऱ्या सव्‍‌र्हिसमध्ये अचूकता दाखवत सोमदेवने हा विजय साकारला.