ऑफ-स्पिनर सईद अजमलच्या भेदक फिरकी माऱ्यासमोर पहिल्या कसोटीत यजमान दक्षिण आफ्रिका संघाची घसरगुंडी उडाली आहे. दुसऱ्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेची पहिल्या डावात ५ बाद १३९ अशी स्थिती झाली असून ते अद्याप १९९ धावांनी पिछाडीवर आहेत. अजमलने पाच विकेट्स मिळवल्या असून त्यापैकी तीन बळी ‘डीआरएस’मुळे मिळवले. कर्णधार ग्रॅमी स्मिथ आणि हाशीम अमला यांना पंचांनी पायचीत नाकारले. पण ‘डीआरएस’द्वारे अपील केल्यानंतर तिसऱ्या पंचांनी त्यांना बाद ठरवले. भरवशाचा फलंदाज जॅक कॅलिसला पंचांनी झेलबाद ठरवले होते, पण दक्षिण आफ्रिकेने पंचांकडे दाद मागितल्यावर तो झेलबाद नसल्याचे समोर आले, पण पंचांनी त्याला पायचीत ठरवले. आता एबी डी’व्हीलियर्स (खेळत आहे २४) आणि डीन एल्गर (खेळत आहे ११) यांच्यावर दक्षिण आफ्रिकेच्या आशा आहेत.