राफेल नदालची विम्बलडन आणि टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतून माघार

राफेल नदाल याने विम्बलडन आणि टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतून माघार घेतलीआहे. शारीरिक थकवा जाणवत असल्याने त्याने या स्पर्धांमधून माघार घेतली आहे.

Rafeal Nadal
राफेल नदालची विम्बलडन आणि टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतून माघार (PHOTO- Reuters)

स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदाल याने विम्बलडन आणि टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं आहे. शारीरिक थकवा जाणवत असल्याने या स्पर्धांमधून माघार घेत असल्याचं त्याने सांगितलं आहे. विम्बलडन स्पर्धा सुरु होण्याच्या ११ दिवसांपूर्वी त्याने हा निर्णय घेतला आहे. तर टोकियो ऑलिम्पिक २३ जुलैपासून सुरु होणार आहे. राफेल नदालने नुकताच फ्रेन्च ओपन स्पर्धेत सहभाग घेतला होता. मात्र या स्पर्धेत जोकोविचकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं.

‘फ्रेन्च ओपन खेळून आता दोन आठवडेच झाले आहेत. पुन्हा विम्बलडन आणि त्यानंतर टोकियो ऑलिम्पिक खेळणं कठीण आहे. त्यामुळे या कालावधीत माझ्या शरीराला तितकासा आराम मिळणं गरजेचं आहे’, असं राफेल नदाल याने स्पष्ट केलं.

फ्रेन्च ओपनमध्ये सर्बियाच्या नोवाक जोकोविचने राफेल नदालला पराभवाची चव चारली होती. चार तासाहून अधिक काळ चाललेल्या सामन्यात नदालची चांगलीच दमछाक झाली. नदालला ३-६, ६-३, ७-६, ६-२ ने पराभूत करत जोकोविचने अंतिम फेरी गाठली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Spain tennis star rafael nadal pull out this year wimbledon and tokyo olympics rmt