लंडन : स्पेनचा माजी तारांकित मध्यरक्षक सेस्क फॅब्रिगासने जवळपास दोन दशकांच्या कारकीर्दीनंतर फुटबॉलमधून निवृत्ती स्वीकारली आहे. २०१०च्या विश्वचषक विजेत्या स्पेन संघात फॅब्रिगासचा समावेश होता. आता ३६ वर्षीय फॅब्रिगास इटलीतील संघ कोमोचे प्रशिक्षकपद भूषवणार आहे.

बार्सिलोनाच्या अकादमीचे फुटबॉलचे धडे गिरवल्यानंतर फॅब्रिगास इंग्लंडमधील आर्सेनल क्लबमध्ये दाखल झाला. फॅब्रिगासला वयाच्या १६व्या वर्षी पदार्पणाची संधी मिळाली होती. त्याने ऑक्टोबर २००३मध्ये लीग चषकात व्यावसायिक कारकीर्दीतील पहिला सामना खेळला. त्या वेळी आर्सेलनकडून खेळणारा तो सर्वात युवा खेळाडू ठरला होता. पुढे त्याने आर्सेनलचे कर्णधारपदही भूषवले, पण २०११मध्ये त्याने बार्सिलोनाकडे परतण्याचा निर्णय घेतला. बार्सिलोनाचे प्रतिनिधित्व करताना त्याने २०१२-१३मध्ये ला लीगचे जेतेपद पटकावले. मात्र, सामने खेळण्याची सातत्याने संधी न मिळाल्याने त्याने बार्सिलोना क्लब सोडण्याचा निर्णय घेतला आणि इंग्लंडमधील चेल्सी संघाने त्याला खरेदी केले. चेल्सीकडून त्याने अप्रतिम कामगिरी केली. चेल्सीने २०१५ आणि २०१७मध्ये प्रीमियर लीगचे जेतेपद मिळवले होते. चेल्सीच्या या यशात फॅब्रिगासची भूमिका महत्त्वाची होती.

Kevin Pietersen's big statement on Sanju Samson
IPL 2024 : “जर मी निवडकर्ता असतो तर…”, इंग्लंडचा माजी दिग्गज केविन पीटरसनचे संजू सॅमसनबाबत मोठं वक्तव्य
IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: आशुतोष शर्माची आयपीएलमध्ये ऐतिहासिक कामगिरी, १७ वर्षांच्या इतिहासात ही कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
Rohit Sharma Talking about his retirement in the Breakfast with Champions show
रोहित शर्मा कधी म्हणणार क्रिकेटला अलविदा? हिटमॅनने निवृत्तीबाबत केलं मोठं वक्तव्य
Rohit breaks Dhoni's sixes record
IPL 2024 MI vs DC : रोहित शर्माने मोडला धोनीचा विक्रम! वॉर्नर-कोहलीच्या ‘या’ खास क्लबमध्येही झाला सामील

चेल्सीकडून पाच हंगामांत खेळल्यानंतर फॅब्रिगासला २०१९मध्ये फ्रेंच क्लब मोनाकोने आपल्या संघात दाखल करून घेतले. मोनाकोकडून तो ६८ सामने खेळला. त्यानंतर गेल्या हंगामापूर्वी त्याला इटलीतील कोमो क्लबने दोन वर्षांसाठी करारबद्ध केले. मात्र, या क्लबकडून एक वर्ष खेळल्यानंतर त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. फॅब्रिगासने क्लब कारकीर्दीत ७३८ सामने खेळताना १२५ गोल नोंदवले.

आंतरराष्ट्रीय पातळीवर फॅब्रिगासने ११० सामन्यांत स्पेनचे प्रतिनिधित्व करताना १५ गोल केले. २०११मध्ये विश्वचषक, तसेच २०१८ आणि २०१२मध्ये युरोपीय अजिंक्यपद स्पर्धा जिंकणाऱ्या स्पेन संघाचा तो महत्त्वाचा सदस्य होता.

सर्वोत्तम मध्यरक्षकांपैकी एक

फॅब्रिगासची सर्वोत्तम मध्यरक्षकांमध्ये गणना केली जायची. चेंडू खेळवण्याची कला, अचूक आणि कलात्मक पासेस देण्याची क्षमता, हे फॅब्रिगासच्या खेळाचे वैशिष्टय़ होते. कारकीर्दीच्या सुरुवातीला आर्सेनलकडून खेळताना तो ‘बॉक्स टू बॉक्स’ मध्यरक्षक म्हणजे आपल्या गोलकक्षात चेंडू मिळवण्यापासून ते प्रतिस्पर्ध्याच्या गोलकक्षात जाऊन गोल करण्यासाठी ओळखला जायचा. परंतु गेल्या दशकभरात, विशेषत: चेल्सीमध्ये दाखल झाल्यानंतर त्याने आपल्या खेळण्याच्या शैलीत काहीसा बदल केला. फॅब्रिगासने आपल्या क्लब आणि आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत मिळून १७ जेतेपदे मिळवली. यात दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्वचषकाचाही समावेश होता.